व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम In the infant trafficking case : बाळ विक्री प्रकरणी चंद्रपुरातील दोन महिलांना...

In the infant trafficking case : बाळ विक्री प्रकरणी चंद्रपुरातील दोन महिलांना अटक; आमदार जोरगेवार समर्थकांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Two Women from Chandrapur Arrested in Baby-Selling Case; Political Circles Abuzz as MLA Jorgewar Supporters Allegedly Linked : बाळ विक्री प्रकरणी दोन्ही महिलांना न्यायालयीन कोठडी

 

Chandrapur : पैशांच्या हव्यासापोटी पोटच्या गोळ्यांचा आणि अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा सौदा करणाऱ्या कसाई मातेच्या कृत्याने चंद्रपूर जिल्हा हादरला असतानाच, आता या प्रकरणाला एक खळबळजनक राजकीय वळण मिळाले आहे. मानवी तस्करीच्या या काळ्या व्यवसायाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी कागदोपत्री लिखापढी करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी, एका राजकीय पक्षाशी संबंधित दोन महिलांना रामनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली.

न्यायालयाने या दोन्ही महिलांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थक असल्याची माहिती समोर आल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले असून राजकीय वर्तुळात कमालीची खळबळ उडाली आहे.

Jal jeevan mission : “सात वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी न्यायालयात का यावे लागते?”

हे संपूर्ण रॅकेट १५ वर्षांच्या पीडित अल्पवयीन मुलीच्या नागपूर येथील प्रसूतीनंतर उघडकीस आले होते. नागपुरात नोंदवण्यात आलेल्या झिरो एफआयआरच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आल्यानंतर, रामनगर पोलीस या बाळ विक्रीच्या व्यवहारात मदत करणाऱ्या इतर संशयितांच्या शोधात होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच पीडित मुलीवर अत्याचार करणारा तिचा प्रियकर अजय फुलझेले, पीडित मुलीची क्रूर माता आणि बेकायदेशीरपणे बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिलांना गजाआड केले आहे.

Devendra fadnavis : “२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, आता दुसरं लग्न करून संसार थाटला”

दरम्यान, बुधवारी अटक करण्यात आलेल्या दोन महिलांपैकी एक महिला गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून आणि संपूर्ण वैद्यकीय खबरदारी घेत रामनगर पोलिसांनी आधी न्यायालयाची विशेष परवानगी मिळवली आणि त्यानंतरच या महिलेला अटक करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि नवजात बाळाचा सौदा अशा अत्यंत संवेदनशील प्रकरणात थेट राजकीय पक्षाशी जुळलेल्या महिला पदाधिकाऱ्यांची नावे आल्याने चंद्रपुरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

मात्र, तपासाची गोपनीयता आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रामनगर पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही महिलांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्याचे टाळले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

error: Content is protected !!