School held outside the Municipal Commissioner’s office as students protest the shortage of teachers : बिना शिक्षकाच्या शाळेत शिकले असते तर अधिकारी झाले असते का?, गुडधेंचा आयुक्तांना सवाल
Nagpur नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊनही नागपूर महानगरपालिकेच्या शाळांची झालेली दुरवस्था आणि शिक्षकांची टंचाई याविरोधात काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे पाटील यांनी आज थेट मनपा आयुक्तांच्या कक्षासमोरच विद्यार्थ्यांची शाळा भरवून प्रशासनाचा तीव्र निषेध केला. मनपा आयुक्त आज शिकून सनदी अधिकारी झाले आहेत, पण ते जर मनपाच्या अशा बिनशिक्षकांच्या शाळेत शिकले असते, तर अधिकारी बनू शकले असते का असा धारदार आणि जळजळीत सवाल गुडधे यांनी यावेळी उपस्थित केला.
नागपूर महानगरपालिकेच्या एकात्मता नगर शाळेत नवीन सत्र सुरू झाले तरी विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उपलब्ध नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्कूल बॅग आणि गणवेश घालून थेट महापालिका मुख्यालय गाठले आणि प्रफुल गुडधे यांच्या नेतृत्वात थेट आयुक्तांच्या केबिनबाहेरच ठिय्या मांडून तिथे वर्ग भरवला.
Jal Jeevan Mission : राज्यातील ७५ टक्के पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्णच
या शाळेत पहिली ते आठवी असे एकूण ११ वर्ग भरतात, मात्र शिकवण्यासाठी केवळ ३ शिक्षक आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या तीन शिक्षकांपैकी एक शिक्षक सध्या मतदार याद्यांच्या’ कामात गुंतलेला असल्याने उर्वरित दोन शिक्षकांवर ११ वर्ग सांभाळण्याची अशक्य कसरत करावी लागत आहे.
या आंदोलनादरम्यान बोलताना प्रफुल गुडधे यांनी मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. महापालिकेत शिक्षकांची प्रचंड टंचाई असून शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या जागेवर नवीन नियुक्ती केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे वर्गात शिकवायला शिक्षक नसताना, दुसरीकडे मनपा प्रशासन विद्यार्थी व शिक्षकांना विविध दिंड्या काढायला लावून सरकारी उपक्रमांमध्ये जुंपत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी करूनही शिक्षण विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचे गुडधे म्हणाले.
Tukaram mundhe : एफडीएच्या नव्या तक्रार पोर्टलवर अस्वच्छ अन्नाबाबत सर्वाधिक तक्रारी,
शाळा सुरू होऊनही हक्काच्या शिक्षकांसाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना थेट आयुक्तांच्या दारापर्यंत यावे लागल्याने मनपाचा ढिम्म कारभार उघडा पडला असून, आतातरी प्रशासन जागे होऊन तातडीने शिक्षक नियुक्त करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








