व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath Shinde Shivsena : शिंदेसेनेची वाशिम जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; सर्व नियुक्त्या रद्द

Eknath Shinde Shivsena : शिंदेसेनेची वाशिम जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; सर्व नियुक्त्या रद्द

Shinde Shivsena dissolves its Washim district executive committee; all appointments cancelled: नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Washim शिंदेसेनेची वाशिम जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, जिल्ह्यातील युवासेना, महिला आघाडी आणि संलग्न संघटनांमधील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नव्या कार्यकारिणीत कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदेसेनेचे सचिव संजय मोरे यांनी २९ जुलै रोजी यासंदर्भातील पत्र जारी केले. पत्रानुसार, जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नव्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार आहेत.

Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह टिप्पणी; गुन्हा दाखल

यापूर्वी एप्रिल आणि जून महिन्यांतही राज्यातील काही जिल्हा कार्यकारिण्या बरखास्त करण्यात आल्या होत्या. अकोला जिल्ह्यात कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर सुमारे महिनाभराने काही पदाधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून पुन्हा संधी देण्यात आली होती. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील नव्या कार्यकारिणीत कोणाला स्थान मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या संदर्भात शिंदेसेनेच्या विधान परिषदेच्या सदस्य भावना गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांवर ९० दिवसांत निर्णय बंधनकारक

मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिम जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा घेतलेला निर्णय आम्ही स्वीकारतो. जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार. यापुढे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो मला व माझ्या सहकाऱ्यांना मान्य असेल, अशी प्रतिक्रिया माजी जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे यांनी दिली.

error: Content is protected !!