व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Amit shah visit : अमित शाहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई!

Amit shah visit : अमित शाहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई!

amit-shah-pune-visit-pune-police-detain-congress-workers-ahead-of-protests : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड, शहरात तणावाचे वातावरण

Pune: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यानिमित्त पुण्यात दाखल झाले असून, त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि युवक काँग्रेसकडून संभाव्य आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी काल रात्रीपासूनच प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घरातून ताब्यात घेण्यात आल्याने पुण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याला विरोध करण्याची तयारी काँग्रेसने केली होती. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. काँग्रेस कार्यकर्ता राहुल शिरसाट याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले असून, येरवडा परिसरासह शहरातील विविध भागांतील अनेक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले आहे.

युवक काँग्रेसचे अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख आणि राजू ठोंबरे या चार कार्यकर्त्यांनाही शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.
यापूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यावेळी राहुल शिरसाट यांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. त्यामुळे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडूनही निदर्शने करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Abhijeet dipke : शिवीगाळ प्रकरणावर अभिजीत दिपकेंचा भाजपवर हल्लाबोल

दरम्यान, काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्तेही सक्रिय झाले असून, पुण्यातील काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर भाजप समर्थकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली उत्सव हॉटेल चौकात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सकाळपासूनच या परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, घोषणाबाजी सुरू आहे.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी अमित शाह पुण्यात आले असून, कार्यक्रमाचे आयोजन कटारिया महाविद्यालयात करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्था अभूतपूर्व ठेवण्यात आली आहे. प्रवेशद्वारांवर प्रत्येकाची कसून तपासणी केली जात असून, डॉग स्कॉड आणि बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात येत आहे.

District bank election : विचारधारा लॉकरमध्ये; जिल्हा बँकेच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे पुणे शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलिस दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या आंदोलनाची हाक आणि भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!