व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण District bank election : विचारधारा लॉकरमध्ये; जिल्हा बँकेच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

District bank election : विचारधारा लॉकरमध्ये; जिल्हा बँकेच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल

Rajendra Shingne and Prataprao Jadhav to serve on the same board of directors in the District Bank election : शिंगणे-जाधव एकाच संचालक मंडळात; सहकाराच्या राजकारणात ‘नव्या खात्याची’ चर्चा

Buldhana जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक यंदा केवळ संचालकपदांची निवड न राहता राजकीय समीकरणांची नव्याने मांडणी करणारा मंच ठरताना दिसत आहे. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्याने सहकाराच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

एकेकाळी वेगवेगळ्या राजकीय तटांवर उभे राहून एकमेकांविरोधात भूमिका घेणारे हे दोन नेते आता एकाच संचालक मंडळात दिसणार आहेत. त्यामुळे विचारधारा, पक्षीय सीमा आणि पूर्वीचे राजकीय संघर्ष यापेक्षा सहकार क्षेत्रातील सत्तासंतुलन अधिक महत्त्वाचे ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर “विचारधारा लॉकरमध्ये ठेवून सहकाराचे नवे खाते उघडले” अशी उपरोधिक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Rain red alert : राज्यात पावसाचा कहर; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

मात्र, ही केवळ दोन नेत्यांची बिनविरोध निवड नसून उर्वरित जागांवरील निवडणुकीचे राजकारणही त्यातून प्रभावित होण्याची शक्यता आहे. अर्जमाघारीची मुदत अद्याप शिल्लक असल्याने इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अंतिम क्षणी समन्वयाचे सूत्र जुळते की बहुरंगी लढती होतात, यावर अनेकांचे राजकीय भविष्य अवलंबून राहणार आहे.

सध्या पडद्यामागे पॅनल उभारणी, जागावाटप आणि समन्वयासाठी चर्चांना वेग आल्याचे बोलले जात आहे. सर्वपक्षीय पॅनलची शक्यता व्यक्त होत असताना काही मतदारसंघांत थेट लढतीचे संकेतही कायम आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांची राजकीय गणिते बदलू लागली असून समर्थकही सावध भूमिका घेत आहेत.

District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत माघारीला ब्रेक; शिंगणे-जाधवांच्या बिनविरोधनंतर राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेचा इतिहास पाहता सहकार क्षेत्रातील सत्ता ही केवळ आर्थिक संस्थेपुरती मर्यादित राहत नाही. ग्रामीण राजकारण, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी क्षेत्र आणि भविष्यातील राजकीय नेतृत्व यांच्याशीही तिचा जवळचा संबंध असतो. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याच्या व्यापक राजकीय घडामोडींच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.

आगामी काही दिवसांत अर्जमाघारीनंतरचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर सर्वपक्षीय समन्वयाचा मार्ग स्वीकारला जातो की थेट निवडणुकीची लढत रंगते, हे निश्चित होईल. मात्र, एका गोष्टीची चर्चा आधीच सुरू झाली आहे—सहकाराच्या तिजोरीची किल्ली मिळवण्यासाठी पक्षीय विचारधारा काही काळ बाजूला ठेवून व्यवहाराचे राजकारण पुढे आले आहे.

error: Content is protected !!