व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home प्रशासकीय Amravati district women’s hospital : अमरावती रुग्णालयातील व्हेंटिलेटर खरेदीवरून आरोप-प्रत्यारोप; उच्चस्तरीय चौकशीची...

Amravati district women’s hospital : अमरावती रुग्णालयातील व्हेंटिलेटर खरेदीवरून आरोप-प्रत्यारोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Amravati hospital ventilator procurement sparks allegations and counter-allegations; demand for a high-level inquiry : सुनील देशमुखांचा सुमारे दोन कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप; वैद्यकीय महाविद्यालयाकडून आरोप फेटाळले

Amravati जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु दक्षता विभागाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असतानाच, अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी करण्यात आलेल्या व्हेंटिलेटर खरेदीवरूनही वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते तथा माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी व्हेंटिलेटरच्या खरेदी दरात मोठी तफावत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्मिता सोनटक्के यांनी हे आरोप फेटाळून लावत खरेदी प्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने झाल्याचे स्पष्ट केले आहे.

२० व्हेंटिलेटरसाठी ४.५ कोटींचा खर्च?

डॉ. सुनील देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २० व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले. या खरेदीसाठी सुमारे ४.५ कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा त्यांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे केला आहे. या खरेदीचा पुरवठा आदेश २७ मार्च २०२६ रोजी देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray : तरुण पदाधिकाऱ्यांकडे सोपवले लोकसभा मतदारसंघ; ठाकरेंची शिवसेना लागली कामाला

व्हेंटिलेटरच्या दरांची खातरजमा करण्यासाठी संबंधित कंपनीच्या अधिकृत पुरवठादाराकडून कोटेशन घेतल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. नागपूर येथील अधिकृत पुरवठादाराच्या कोटेशननुसार एका व्हेंटिलेटरची जीएसटीसह किंमत १३.२२ लाख रुपये असल्याचा त्यांचा दावा आहे. तर सरकारी खरेदीमध्ये एका व्हेंटिलेटरसाठी २२ लाख ५५ हजार ५४४ रुपये खर्च झाल्याचे ते म्हणाले.

अधिकृत वितरकाच्या कोटेशनमधील दर आणि सरकारी खरेदीचा दर यांची तुलना केल्यास २० व्हेंटिलेटरच्या खरेदीत मोठी आर्थिक तफावत निर्माण होत असल्याचा दावा डॉ. देशमुख यांनी केला. या आधारावर त्यांनी सुमारे दोन कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे.

केवळ व्हेंटिलेटर खरेदीपुरता हा विषय मर्यादित ठेवू नये, अशी मागणी डॉ. देशमुख यांनी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून याच आर्थिक वर्षात आयसीयूसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या पेशंट मॉनिटर, सेंट्रल स्टेशन, पोर्टेबल अल्ट्रासाऊंड आणि डीफिब्रिलेटर यांसारख्या उपकरणांच्या खरेदीचीही चौकशी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

Election Commission : महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना नोटिसा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

या उपकरणांच्या खरेदीसाठी सुमारे ३.२७ कोटी रुपयांचे कंत्राट कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटरला देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला असून, संबंधित उपकरणांच्या दरांची बाजारभावाशी तुलना करण्याची मागणी केली आहे.

बडनेराचे आमदार रवी राणा यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. व्हेंटिलेटरची नेमकी किंमत किती आणि ते किती रुपयांना खरेदी करण्यात आले, याची निश्चितपणे चौकशी झाली पाहिजे. रुग्णालयातील आगीची चौकशी सुरू असून, त्यासोबत व्हेंटिलेटर आणि इतर साहित्याच्या खरेदीत गैरप्रकार झाला आहे का, हेही स्पष्ट होईल, असे राणा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्मिता सोनटक्के यांनी व्हेंटिलेटर खरेदीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी २० उच्च गुणवत्तेचे व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले आहेत. ही खरेदी शासकीय नियमांनुसार ऑनलाइन निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात आली असून, यात शासनाच्या ४५ लाख ३९ हजार १२० रुपयांची बचत झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Manoj Jarange : आंदोलनाची धग राज्यभर; सरकारचा संयमाचा सूर, तर जरांगेंचा आक्रमक पलटवार

वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्तांची तांत्रिक मान्यता आणि जिल्हा वार्षिक योजनेची प्रशासकीय मंजुरी घेऊन महा-ई-टेंडर प्रणालीवर निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. स्वित्झर्लंडमधील ‘हेमिल्टन’ कंपनीचे व्हेंटिलेटर अधिकृत विक्रेत्यामार्फत खरेदी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एका व्हेंटिलेटरसाठी २४ लाख ८२ हजार ५०० रुपयांची प्रशासकीय मान्यता होती. मात्र, निविदेत सर्वात कमी दर २२ लाख ५५ हजार ५४४ रुपये प्राप्त झाला. त्यामुळे एका व्हेंटिलेटरमागे २ लाख २६ हजार ९५६ रुपयांची बचत झाली असून, २० व्हेंटिलेटरच्या खरेदीत एकूण ४५ लाख ३९ हजार १२० रुपयांची बचत झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

error: Content is protected !!