व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Fastag one tag : फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता करता येणार पोर्ट

Fastag one tag : फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता करता येणार पोर्ट

fastag-one-tag-portability-bank-change-without-changing-sticker-nitin-gadkari : ‘वनटॅग’ने बँक बदलण्याचा त्रास होणार हद्दपार

New Delhi : फास्टॅग वापरणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची सुविधा आणली जात आहे. मोबाईल क्रमांक एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करता येतो, त्याच धर्तीवर आता फास्टॅग एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पोर्ट करता येणार आहे. विशेष म्हणजे बँक बदलताना वाहनावरीलफास्टॅग स्टिकर काढून नवीन टॅग लावण्याची गरज राहणार नाही. ‘वनटॅग’ या सुविधेमुळे वाहनावरील टॅग तोच ठेवून त्याच्याशी संबंधित जारीकर्ता बँक बदलता येणार आहे.

सध्या एखाद्या ग्राहकाला फास्टॅग जारी करणाऱ्या बँकेची सेवा पसंत नसेल आणि दुसऱ्या बँकेची सेवा घ्यायची असेल, तर जुना फास्टॅग बंद करून नवीन घ्यावा लागतो. त्यानंतर वाहनावरील जुना टॅग काढून नवीन टॅग लावण्याची प्रक्रिया करावी लागते. नव्या व्यवस्थेमुळे हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

राजमार्ग यात्रा ॲपच्या माध्यमातून फास्टॅग पोर्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. ग्राहकांना डिजिटल पद्धतीने आपल्या फास्टॅग जारीकर्ता बँक बदलता येईल. त्यामुळे बँक बदलण्यासाठी टॅग बदलण्याची आवश्यकता राहणार नाही. फास्टॅग तोच राहील, मात्र त्याच्याशी जोडलेली बँक बदलता येईल.

Ratnakar Mahajan : काँग्रेसचा अभ्यासू आणि निष्ठावंत शिलेदार काळाच्या पडद्याआड

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६मध्ये ‘वनटॅग’ सुविधेची माहिती दिली. फास्टॅग प्रणाली अधिक ग्राहकस्नेही आणि सोयीस्कर करणे, हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश आहे. मोठ्या प्रमाणावर फास्टॅग वापर होत असल्याने या सुविधेमुळे लाखो वाहनधारकांना फायदा होण्याची शक्यता आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत सुमारे १३ कोटी फास्टॅग जारी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गांवरील जवळपास ९८ टक्के टोल संकलन फास्टॅग माध्यमातून डिजिटल पद्धतीने होत आहे. त्यामुळे संबंधित सेवा अधिक सुलभ करण्यावर सरकारचा भर आहे. दरम्यान, भविष्यात टोल व्यवस्थेत आणखी मोठे तांत्रिक बदल होण्याची शक्यता आहे.

Hindu rashtra samiti : ‘आज मनुस्मृती जाळली, उद्या काय जळणार?’; मनुस्मृती जाळल्याप्रकरणी अकोल्यात तक्रार

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), बॅरियर-फ्री टोलिंग आणि फ्री-फ्लो मोबिलिटीच्या माध्यमातून वाहनांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज कमी करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. त्यामुळे टोल ओळख आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया अधिक स्वयंचलित आणि वेगवान होऊ शकते. एकूणच, ‘वनटॅग’मुळे फास्टॅग वापरकर्त्यांना बँक बदलण्यासाठी नवीन टॅग घेणे, जुना टॅग काढणे आणि पुन्हा स्टिकर लावणे या प्रक्रियेतून दिलासा मिळणार आहे. या व्यवस्थेला अधिक लवचिक आणि डिजिटल बनवण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा बदल मानला जात आहे.

error: Content is protected !!