व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांची पहिलीच सही सतीश शिंदेंच्या नियुक्तीपत्रावर!

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांची पहिलीच सही सतीश शिंदेंच्या नियुक्तीपत्रावर!

Sunetra Pawar’s first signature appeared on Satish Shinde’s appointment letter : शिंदेंची पुनरागमनाची वाट रोखून धरली होती, विदर्भातील बड्या नेत्यांना जोरदार राजकीय धक्का

Nagpur कौटुंबिक संबंधांमुळे शरद पवार की अजित पवार, अशा राजकीय कोंडीत सापडलेले जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सतीश शिंदे यांची अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश उपाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरी शेऱ्याने जारी झालेले पहिलेच नियुक्तीपत्र शिंदे यांना प्रदान करण्यात आले. या निर्णयामुळे गेल्या वर्षभरापासून शिंदे यांची पक्षातील पुनरागमनाची वाट रोखून धरणाऱ्या विदर्भातील बड्या नेत्यांना जोरदार राजकीय धक्का बसला आहे.

अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर शिंदे त्यांच्यासोबत गेले होते; मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिल्व्हर ओक वरून थेट शरद पवारांचा फोन आला आणि पुण्याचा दौरा आखावा लागला. पवारांचा शब्द मोडता न आल्याने शिंदे यांनी राजीनामा देऊन मूळ पक्षात परतण्याचा निर्णय घेतला.

Cabinet Meeting : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांना मोठा दिलासा !

दादांनी शिंदे यांची कौटुंबिक अडचण ओळखून त्यांचा राजीनामा स्वीकारलाच नाही. मात्र, या राजकीय खेळात शिंदे यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली. शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांना पूर्णपणे आपली मानत नव्हती, तर अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांना स्वीकारायला तयार नव्हती. स्थानिक कार्यक्रमांचे आमंत्रण नाकारण्यापासून ते विदर्भातील काही वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना सातत्याने डावलले जात होते.

नागपुरातील एका मेळाव्यात अजित पवारांनी शिंदे यांना मंचावर बोलावून नियुक्तीचे अप्रत्यक्ष संकेत दिले होते. परंतु, निवडणुकीत सोडून गेलेल्यांना पक्षात घेऊ नये, असा ताठर पवित्रा घेत विदर्भातील नेत्यांनी कार्यकारिणीत थेट ठरावच मंजूर करून घेतला. अजित पवारांनीही हा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोडल्याने शिंदे ताटकळत राहिले.

Akash Fundkar : शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट, वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

अजित दादांच्या अपघाती निधानंतर शिंदे यांची वाट अधिकच बिकट झाली होती. मात्र, पक्षीय सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी थेट पुण्यात शिंदे यांना बोलावून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. विदर्भातील अंतर्गत विरोधाची फिकीर न करता, सुनेत्रा पवारांनी शिंदे यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली असून, त्यांच्याकडे सावनेर विधानसभा मतदारसंघाची विशेष धुरा दिली आहे. काटोलचे दोन वेळा आमदार राहिलेल्या सुनील शिंदेंचा राजकीय वारसा लाभलेल्या सतीश शिंदे यांच्या या पुनरागमनाने नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे.

error: Content is protected !!