व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Amravati Crime : ऐकावं ते लवनलच! मृत युवकाला जिवंत करण्यासाठी जादूटोणा?

Amravati Crime : ऐकावं ते लवनलच! मृत युवकाला जिवंत करण्यासाठी जादूटोणा?

Black magic performed to bring dead youth back to life; five detained : स्मशानभूमीतील गूढ प्रकरणी पाच जण पोलिसांच्या ताब्यात; ब्राह्मणवाडा थडी पोलिसांची धडक कारवाई

Amravati जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील हिंदू स्मशानभूमीत मृत युवकाच्या दफनस्थळी कथित जादूटोणा व पूजाविधी केल्याच्या प्रकरणी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत पाच जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा, २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राह्मणवाडा थडी येथील महेंद्र राजू गवळी (२७) यांचे निधन झाल्यानंतर १५ सप्टेंबर रोजी हिंदू स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादीच्या मित्राने फोन करून स्मशानभूमीत संशयास्पद पूजाविधी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असता दफनस्थळाजवळ तंबाखू, चार अगरबत्त्या, माचिस, फुटाणे, अत्तराची छोटी बाटली, काळी टोपी आदी साहित्य आढळून आले.

Sanjay Raut Amit Shah : गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानेच धनुष्यबाण शिंदेंना; संजय राऊत यांचा दावा

तसेच स्मशानभूमीच्या कंपाउंडलगत लाल रंगाची हुंदाई एक्सेंट कार (क्रमांक एमएच-०३-सीएच-२६६५) उभी असल्याचेही निदर्शनास आले. या साहित्याच्या आधारे अज्ञात व्यक्तींनी मृत महेंद्र गवळी यांना जिवंत करण्यासाठी किंवा अन्य कोणत्यातरी हेतूने कथित जादूटोणा स्वरूपाचा विधी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

पाच जण ताब्यात

याप्रकरणी पोलिसांनी नीलेश मनोहरराव सोनटक्के (३४, संतोषी नगर, अमरावती), सुबोध प्रकाश भोयर (३०, उदखेड, जि. अमरावती), आशुतोष महादेव तायडे (३०, गोमाजी नगर, अकोला), साहेबराव पांडुरंग गायकवाड (५६, समतानगर, पुणे, सध्या ठाणे) आणि चंदू गणेशलाल गुप्ता (४३, कुंभारपुरा, ब्राह्मणवाडा थडी) यांना ताब्यात घेतले आहे.

ब्राह्मणवाडा थडी पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ४६१/२०२६ नोंदविण्यात आला असून, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१) व ३(२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

Nana Patole : सरकारला जाग का येत नाही? दुष्काळाच्या मागणीत राजकारण कुठे आले?

गूढ अद्याप कायम

मृत युवकाच्या दफनस्थळाचीच निवड का करण्यात आली? कथित विधीमागे नेमका उद्देश काय होता? या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? मृत व्यक्तीला जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता की हा अंधश्रद्धेशी संबंधित अन्य प्रकार होता, याबाबत पोलिस तपास सुरू आहे.

पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू असून, या प्रकारामागील नेमका हेतू तपासातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या गूढ प्रकरणाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!