व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Disha Salian case : दिशाच्या वडिलांचा आदित्य ठाकरेंवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा;...

Disha Salian case : दिशाच्या वडिलांचा आदित्य ठाकरेंवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा; माफी मागायला सात दिवसांची मुदत

Disha Salian’s father files ₹500-crore defamation suit against Aaditya Thackeray; gives seven days to apologise : सतीश सालियान नौटंकी करत असल्याचा संजय राऊतांचा घणाघात

Mumbai दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाने आता अत्यंत नाट्यमय आणि राजकीय वळण घेतले आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी थेट मातोश्रीवर जाऊन आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर तब्बल ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला असून माफी मागण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. यावरून राजकीय वातावरण तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सालियान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सालियान यांची केवळ नौटंकी सुरू असल्याचा घणाघाती आरोप राऊत यांनी केला.

राज्य सरकारने आधी बंद केलेल्या या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडली असून, तपासाची सूत्रे आता पूर्णपणे सीबीआयकडे सोपवण्यात आली आहेत. न्यायालयाने या प्रकरणी आदेश देतानाच कोणालाही आधीच आरोपी गृहीत धरू नका, फक्त पारदर्शक तपास करा, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, सीबीआयने आदित्य ठाकरे यांच्यासह सतीश सालियान यांच्या जबाबानुसार तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यासह अनेकांची नावे एफआयआरमध्ये नोंदवल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Mohan mate: भाजपचे नेते खोटे बोलत नाहीत, मोहन मतेंनी पहिले कौतुक केले, मग मागणी केली

 

या सर्व घडामोडींवर बोलताना संजय राऊत यांनी महायुती सरकारवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. सीबीआयच्या माध्यमातून महायुती सरकार विरोधकांवर दबाव टाकण्याचे काम करत असून थेट न्यायालयाच्या सूचनांचे उल्लंघन करत आहे, असे राऊत म्हणाले. तसेच, ठाकरे घराण्यावर टीका किंवा थेट आरोप केले की व्यापक प्रसिद्धी मिळते, सतीश सालियान नेमके तेच करत आहेत. जर यात काही तथ्य होते, तर ते तब्बल सहा वर्षे गप्प का बसले होते असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणामागे काही छुपी शक्ती आणि राजकीय सूत्रधार असल्याचा थेट संशय व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!