व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Amit Shah, Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार हे तर अमित शहांचे ‘छोटा...

Amit Shah, Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार हे तर अमित शहांचे ‘छोटा शकील’, संजय राऊतांचा थेट आरोप

Sanjay Raut alleges that Chief Election Commissioner Gyanesh Kumar is Amit Shah’s ‘Chhota Shakeel’ : ‘एसआयआर’वरून वाद चिघळला: मुख्य निवडणूक आयुक्तांवर घणाघात

Mumbai देशामध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रिया SIR आणि मतदारयाद्यांमधून Voter list मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद थेट चव्हाट्यावर आले आहेत. इतर दोन निवडणूक आयुक्तांचा तीव्र विरोध डावलून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ माजला आहे.

यावरून इंडिया आघाडी आणि विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तर ज्ञानेश कुमार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ‘छोटा शकील’ असल्याचा थेट आणि सनसनाटी आरोप करत ते पूर्णपणे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याची खरमरीत टीका केली आहे.

Chandrapur guardian minister : मोठा प्रकल्प नाही, रोजगाराचा ठोस अजेंडा नाही; मग चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांची उपलब्धी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्त – सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या काही महिन्यांत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या एकतर्फी कारभाराविरोधात आणि नावे वगळण्याच्या पद्धतीवर तब्बल १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले आहेत. मात्र, हे सर्व आक्षेप डावलून निर्णय लादले जात असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणावरून विरोधक आता अधिकच आक्रमक झाले आहेत.

‘एसआयआर’ला सुरुवातीपासूनच काँग्रेस तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा तीव्र विरोध होता. या एसआयआरच्या माध्यमातून काँग्रेस आणि विरोधी पक्षांची सहानुभूती असलेल्या मतदारांची नावे जाणीवपूर्वक मतदारयाद्यांमधून वगळली जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. आतापर्यंत लाखो मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून गहाळ झाल्याचा दावाही विरोधकांकडून केला जात आहे.

Eknath Shinde draught review : एकनाथ शिंदेंच्या दुष्काळ दौऱ्यात मोठा ट्विस्ट; गावांमध्ये पोहोचता आले नाही, तासन्‌तास वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचा संताप

या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील निवडणुकांमध्ये अशाच प्रकारे एसआयआर राबवण्यात आला होता आणि त्यानंतर या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला राजकीय फायदा होऊन ती निवडून आली. हा सर्व भाजपचा ठरवून आखलेला ‘गेमप्लान’ आहे. स्वायत्त असलेली निवडणूक आयोग संस्था आता पूर्णपणे भाजपच्या ताटाखालचे मांजर झाली असून, मुख्य निवडणूक आयुक्त हे पूर्णपणे सरकारच्या तालावर नाचत आहेत. निवडणूक आयोगातील या अभूतपूर्व अंतर्गत फुटीमुळे आणि विरोधी पक्षांच्या आक्रमक पवित्र्यामुळे येत्या काळात या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

error: Content is protected !!