व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र फळ बागा संकटात धरणाचे पाणी शेतकऱ्यांना द्या आ. वानखेडे यांची आग्रही मागणी...

फळ बागा संकटात धरणाचे पाणी शेतकऱ्यांना द्या आ. वानखेडे यांची आग्रही मागणी !

सिंचनाचे पाणी राखीव ठेवण्यासह वीजपुरवठा पूर्ववत करण्यावरही भर

Arvi : अल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आणि पावसाच्या अनियमिततेमुळे आर्वी विधानसभा मतदारसंघातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे गंभीर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. परिसरातील सुमारे १२ ते १३ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना पाण्याची गरज लक्षात घेता धरणातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी आमदार सुमित वानखेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीमुळे फळबागांच्या संरक्षणासाठी आता लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यांतील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून धरणातील पाणी उपलब्ध करून देण्याबाबत प्राधान्याने विचार करावा, अशी भूमिका आमदार वानखेडे यांनी मांडली. कार नदी प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या फळबागा वाचविण्यासाठी कृषी पंपांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली. त्याचबरोबर सिंचनासाठी आवश्यक पाणीसाठा राखीव ठेवून त्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

मेडिगड्डा बॅकवॉटरचा प्रश्न तेलंगणा विधानसभेत गाजणार? शेतकऱ्यांनी आमदार रेड्डी यांच्यासमोर मांडल्या व्यथा !

संत्रा आणि मोसंबीच्या बागा उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक वर्षे मेहनत घ्यावी लागते. रोपांची लागवड, संगोपन, खते, औषधे आणि सिंचन यावर मोठा आर्थिक खर्च केला जातो. अशा परिस्थितीत पाण्याअभावी बागा वाळल्यास शेतकऱ्यांचे केवळ चालू हंगामाचेच नव्हे, तर अनेक वर्षांच्या गुंतवणुकीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून प्रशासनाने आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याचे आमदार वानखेडे यांनी स्पष्ट केले.

ऐन दिवाळीत हक्काची मजुरी मिळाली, आमच्या घरात आनंदाचे दिवे उजळले… धन्यवाद सुधीरभाऊ!

हवामानातील संभाव्य बदल आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे फळबाग उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर मांडत आमदार सुमित वानखेडे यांनी धरणातील पाणी आणि कृषी पंपांच्या वीजपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. आता प्रशासन या मागण्यांवर कोणता निर्णय घेते आणि फळबागांच्या संरक्षणासाठी प्रत्यक्षात किती पाणी उपलब्ध करून दिले जाते, याकडे आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!