व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाणी, चारा आणि पाणंद रस्त्यांना प्राधान्य; पालकमंत्री डॉ. पंकज...

दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाणी, चारा आणि पाणंद रस्त्यांना प्राधान्य; पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत; जिल्ह्यात ५५० पाणंद रस्ते, कालवे व पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीवर भर

 

Wardha : दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेण्यासोबतच दुष्काळामुळे प्रभावित झालेल्या शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. आगामी काळात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी, सिंचन व्यवस्था, चारा उपलब्धता, पाणंद रस्ते आणि वीजपुरवठा या बाबींना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

सेलू तालुका प्रशासनाच्या वतीने भटक्या – विमुक्त जाती – जमातींच्या कुटुंबांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सेंद्रिय खताचे वाटप, दिवाळी फराळ किटचे वितरण, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलांचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. भोयर बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, सेलू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, माजी नगराध्यक्ष राजेश जयस्वाल, तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तसेच अन्य पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

४७ गावांच्या प्रश्नांसाठी मुनगंटीवार ठाम ; मुख्यमंत्र्यांकडून कन्हाळगाव अभयारण्यासंदर्भात प्रशासनाला निर्देश

 

कमी पर्जन्यमानामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने आवश्यक नियोजन सुरू केले आहे. नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करून जलसंधारण आणि पाणी बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी पाणंद रस्त्यांची मोठी अडचण येत होती. ही समस्या दूर करण्यासाठी राज्यभर पाणंद रस्ते उभारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून वर्धा जिल्ह्यातील ५५० पाणंद रस्त्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय धाम आणि बोर प्रकल्पांतून अधिकाधिक शेतजमिनींना सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी कालवे आणि पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. शासन शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून वंचित आणि गरीब घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गोकुळ’ अखेर महायुतीच्या ताब्यात; सतेज पाटलांना धक्का, मुख्यमंत्र्यांची खेळी यशस्वी

शेतकरी हा देशाच्या विकासाचा कणा असून तो सातत्याने कष्ट करून अन्नधान्य उत्पादन करतो. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे मत नगराध्यक्ष स्नेहल देवतारे यांनी व्यक्त केले. सेलू तालुक्यात नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात आली. या माध्यमातून २५३ विविध प्रकारचे शासकीय दाखले वितरित करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या सेंद्रिय खताचे वाटप करण्यात आले. नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून उत्पादित खताला बाजारपेठ मिळावी आणि त्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने प्रत्येक कुटुंबाला २०० किलो खत देण्यात आले. दिवाळीच्या निमित्ताने विविध योजनांचा लाभ थेट गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रशासनाचा हा उपक्रम ठरला.

____

error: Content is protected !!