दादर नामांतरणाचा वाद आता नागपूरपर्यंत; राऊतांच्या सल्ल्याने भाजपची कोंडी
Nagpur मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरणावरून सुरू झालेला राजकीय वाद आता उपराजधानी नागपूरपर्यंत येऊन पोहोचला आहे. उद्धव ठाकरे सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी थेट नागपूर शहराला ‘दीक्षाभूमी’ असे नाव देण्याची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. राऊत यांच्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा नामांतरणाच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत दादर स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून याला विरोध दर्शवण्यात आला होता. हा वाद वाढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर रेल्वे स्थानकाचे नव्हे, तर दादर मेट्रो स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्याचे ठरले असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी नागपूर शहराच्या नामांतरणाचा मुद्दा पुढे करत भाजपसमोर नवा राजकीय पेच निर्माण केला आहे.
यापूर्वी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणावरून महाराष्ट्राने मोठा संघर्ष आणि आंदोलने पाहिली आहेत. जोगेंद्र कवाडे यांच्या नागपूर ते मराठवाडा ‘लॉंग मार्च’नंतर विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते. आता दादर आणि नागपूरच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा तशाच प्रकारचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; रुग्णालयात दाखल महिलेकडेही कर्जवसुलीचा तगादा
नागपूर शहराची ओळख ही ‘दीक्षाभूमी’ आणि ‘संघभूमी’ अशी आहे. दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर देश-विदेशातून लाखो अनुयायी येतात, तर दुसरीकडे रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा पार पडतो. या दोन्ही ऐतिहासिक केंद्रांमुळे संपूर्ण देशाचे लक्ष नागपूरकडे असते. अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केलेल्या दीक्षाभूमी नामांतरणाच्या मागणीवर आता भाजपकडून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणावरून यापूर्वी महाराष्ट्रात मोठा जातीय संघर्ष निर्माण झाला होता. मोठ मोठी आंदोलन करण्यात आली होती. आंबेडकरी नेते जोगेंद्र कवाडे यांनी नागपूर ते मराठवाडा असा लॉंग मार्च काढला होता. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असे नाव देण्यात आले होते. आता दादर रेल्वे स्थानकावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजप आणि उद्धव ठाकरे सेनेपासून यास सुरुवात झाली असली तरी भविष्यात याचे पडसाद उमटणार असल्याचे दिसून येते.
दीक्षाभूमी आणि संघभूमी अशी नागपूर शहराची ओळख आहे. दसऱ्यादिवशी दोन्ही ठिकाणी मोठा सोहळा होते. धन्मचक्र दिनाच्या दिवशी दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी देशविदेशातून लाखो अनुयायी नागपूरला येत असतात. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने रेशीमबाग मैदानावर विजयादशमी सोहळा आयोजित केला जातो. या दोन्ही सोहळ्याके संपूर्ण देशाचे लक्ष लागले असते. त्यात संजय राऊत यांनी नागपूर शहराला दीक्षाभूमी असे नाव देण्याची सूचना केली आहे.
यावरून आता राजकीय वादाला सुरुवात होणार आहे. नामांतरणाचा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या नामंतरणावरून संजय राऊत यांनी भाजपची कोंडी केली आहे. त्यास आता भाजपच्यावतीने काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








