Breaking

Incident at Somthana : खरेदी रखडल्याने शेतकऱ्याने अंगावर घेतले पेट्रोल

As the purchase stopped, the farmer poured petrol on himself : चिखली तालुक्यातील साेमठाणा हमी केंद्रावरील घटना

Buldhana बारदाना नसल्याने नाफेडच्या खरेदी केंद्रावर खरेदी रखडली आहे. खरेदी रखडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल घेतले. सोबतच्या शेतकऱ्यांनी त्याला वेळीच रोखल्याने भीषण अनर्थ टळला. ज्ञानेश्वर दिनकर सावळे (रा. डोंगरशेवली, ता. चिखली. जि. बुलढाणा) असे संतप्त शेतकऱ्याचे नाव आहे. अडवणुकीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे सरकार व प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

हमीभाव केंद्रावर तीन दिवसांपासून सोयाबीन पडून होते. सोयाबीन खरेदीसाठी विलंब लागत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. हमीभाव केंद्रावर उपस्थित इतर सहकारी शेतकऱ्यांनी वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील अहिल्याबाई सहकारी संस्थेच्या हमीभाव केंद्रावर हा प्रकार घडला.

Amravati Congress : पराभव विसरा, कामाला लागा !

कशामुळे टोकाचे पाऊल?
बारदाना उपलब्ध नसल्याने हमीभाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रखडली होती. डोंगरशेवली येथील शेतकरी ज्ञानेश्वर दिनकर सावळे यांनी त्यांच्या शेतातील अंदाजे ५० क्विंटल सोयाबीन सोमठाणा येथील ‘आम्ही भाऊ केंद्रा’वर आणले होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सोयाबीन गाडीत तसेच पडून होते. सोयाबीन खरेदी होत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा अखेर संयम सुटला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले.

शेतकरी संतप्त
‘मी मेलो तरी चालेल पण बाकीच्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे’, असे म्हणत ज्ञानेश्वर सावळे यांनी पेट्रोल ओतून घेतले. आमच्या मालाची यांना किंमत नाही, किती दिवस संयम ठेवायचा? आता संयम सुटला आहे, या शब्दांत सावळे यांनी पेट्रोल ओतण्यापूर्वी संताप व्यक्त केला. दरम्यान या घटनमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील राजकारणही ढवळून निघाले आहे.