व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Use of chemical fertilizers : रासायनिक खतांचा वापर वाढल्याने धोका

Use of chemical fertilizers : रासायनिक खतांचा वापर वाढल्याने धोका

Unclean water invites many diseases : अशुद्ध पाण्यापासून अनेक आजारांना मिळते निमंत्रण

वर्धा : रासायनिक खतांचा वापर वाढल्याने पाण्यातील नायट्रेटचे प्रमाणही वाढले आहे. हे प्रमाण प्रतिलिटर ४५ मिलिग्रॅमपेक्षा जास्त असायला नको. जिल्ह्यातील पाणी परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पाण्याची प्रत व जमिनीचा प्रकार, क्षाराचे प्रमाण, पाणी आणि जमिनीतील इतर घटक, तसेच जमिनीतील जैविक विविधता, यावर खताची उपलब्धता अवलंबून आहे. खते फेकून टाकल्यास ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाया जातात. याचा परिणाम खर्चात वाढ आणि उत्पादन कमी मिळते. नायट्रेटमुळे थायरॉइडच्या समस्या होऊ शकतात. प्रतिकूल गर्भधारणेचे परिणाम होऊ शकतात. कोलोरेक्टल कर्करोग होऊ शकतो.

Sanjay Gandhi Niradhar Yojana : तांत्रिक अडचणीमुळे निराधारांनी गमावला ‘आधार’

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण ५० मिलिग्रॅम / लिटरपेक्षा जास्त असेल, तर ते एकूण नायट्रेट सेवनाचे प्रमुख स्रोत असते.
युरिया जमिनीत मुरल्यानंतर पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढते व नदी, नाले, विहिरी, कूपनलिकांमधील पाण्यात मिसळले जाते. पिण्याच्या पाण्याद्वारे नायट्रेट शरीरात जात असल्याने मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नायट्रेट हे एक रासायनिक संयुग आहे जे कॅल्शियम, सोडियम किंवा बायकार्बोनेट सारखेच पाण्यात विरघळते.

नायट्रेट हे नायट्रोजन आणि ऑक्सिजनपासून १ ते ३ च्या प्रमाणात बनलेले असते. पाण्यात नायट्रेटचे कमाल प्रमाण प्रतिलिटर ५० मिलिग्रॅमपेक्षा जास्त आढळून आले आहे. ५१ मिलिग्रॅम प्रतिलिटर असलेले पाणी पिण्यायोग्य नसते. रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. यामुळे मानवी आरोग्यावर आणि जमिनीवर विपरीत परिणाम होत आहे. रासायनिक खतांमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी झाल्यामुळे मातीचे आम्लीकरण होऊ शकते.

Sudhir Mungantiwar : आधी २०२ कोटींचा विक्रमी पिक विमा अन् आता मिळवून दिला धानाचा बोनस !

मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. शेतशिवारात परंपरागतपणे आढळून येणारी जैवसाखळी जवळजवळ नामशेष झाल्या आहेत. शिवाराशिवारात आढळून येणारे काही ठरावीक प्राणी, पक्षी आणि कीटकांचे तर दर्शनसुद्धा रासायनिक खतांमुळे दुर्मीळ झाले आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब होत नसल्याने शेतजमीन नापीक होत असताना आता आजुबाजूचे पाणीदेखील प्रदूषणयुक्त होत आहे. रासयनिक खतांचा किती नुकसान करणारा प्रसंग आहे हे दिसून येते. शुद्धपाणी केवळ नावालाच उरले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

error: Content is protected !!