व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Amravati Municipal corporation : नगरसेविका म्हणतात, पुरुषच बोलतात, आम्हाला बोलायची संधीच मिळत...

Amravati Municipal corporation : नगरसेविका म्हणतात, पुरुषच बोलतात, आम्हाला बोलायची संधीच मिळत नाही

Women corporators say only men get to speak, while they are not given an opportunity to voice their views : अमरावती महापालिकेत महिला नगरसेवकांचा संताप, संख्याबळ अधिक असूनही अन्याय होत असल्याची भावना

Amravati अमरावती महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महिला नगरसेवकांनी सभागृहातील कामकाजाच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेत महिला नगरसेविकांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असतानाही प्रभागातील प्रश्न मांडण्यासाठी पुरेशी संधी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी प्रश्नोत्तराचा कालावधी संपल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वपक्षीय महिला नगरसेविका आक्रमक झाल्या. एखादी महिला नगरसेविका बोलण्यासाठी उभी राहिली की दुसरा विषय काढून तिचे बोलणे थांबविले जाते, असा आरोप करत त्यांनी सभागृहातच आपली भूमिका स्पष्ट केली.
रजनी डोंगरे, सुमती ढोके, कल्याणी तायडे, अनिता काळे, माधुरी ठाकरे, स्मिता सूर्यवंशी, सोनाली नाईक, स्नेहा लुल्ला, पंचफुला चव्हाण, डॉ. मधुरा कहाळे, नूतन भुजाडे, राधा कुरील, प्रीती रेवणे, लविना हर्षे, प्रियांका पाटणे, नंदा सावदे आणि पद्मजा कौडिण्य आदी नगरसेविकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. बडनेराच्या नगरसेविका रजनी डोंगरे यांनी महिला नगरसेविकांसाठी सभागृहात स्वतंत्र व पुरेशा प्रमाणात माइकची व्यवस्था करण्याची मागणी केली.

 

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचे रामरक्षा पठण हा निव्वळ ढोंगीपणा, जनाधार गेल्यावर राम आठवला

महापौरांचे आश्वासन
महिला नगरसेविकांचा वाढता आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी उर्वरित प्रश्न त्यांच्या दालनात संबंधित विभागप्रमुखांच्या उपस्थितीत सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर सभागृहातील वातावरण काहीसे निवळले.
‘बदली करा, अन्यथा राजीनामा देईन’
दरम्यान, नगरसेविका कल्याणी तायडे यांनी आपल्या प्रभागातील एका सुपरवायझरवर मनमानी कारभाराचा आरोप करत त्याच्या तातडीच्या बदलीची मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यामुळे मानसिक त्रास होत असल्याचा आरोप करत, बदली न झाल्यास नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावर महापौरांनी हस्तक्षेप करून संबंधित प्रकरणाची तातडीने दखल घेतली जाईल व आवश्यक प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर तायडे यांनी आपला आक्रमक पवित्रा मागे घेतला.

error: Content is protected !!