Shyam manav alleged that dhirendra shastri don’t have any spiritual power : १० वेळा चिठ्ठी लावूनही माझा नंबर लागला नाही, लोकांची फसवणूक करणारा ठग असल्याचा आरोप
Nagpur स्वतःकडे दिव्य शक्ती असल्याचा दावा करणारे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा हे अत्यंत चाणाक्ष असून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारण्याऐवजी नागपुरातून पळ काढला आहे. त्यांच्याकडे कोणतीही अलौकिक शक्ती नसून ते केवळ लोकांची फसवणूक करणारे ‘ठग’ आहेत, असा खळबळजनक आरोप अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांनी आज केला. १० वेळा चिठ्ठी लावूनही माझा नंबर लागला नाही, यावरूनच या बाबाचा ‘दिव्य दरबार’ किती बनावट आहे हे स्पष्ट होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
श्याम मानव पुढे म्हणाले की, जर बागेश्वर बाबाकडे दिव्य शक्ती होती, तर त्यांना पत्रकार भवनात येऊन आव्हान स्वीकारायला काय अडचण होती? सरकारने त्यांना पूर्ण पोलीस सुरक्षा पुरवली असतानाही त्यांनी पळ काढला. आव्हानासाठी शर्ती आणि अटींचे पत्र पाठवणे हे केवळ वेळकाढूपणाचे बहाणे आहेत. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात पाच मिनिटांत कुणाचीही माहिती मिळवणे शक्य आहे. या बाबाला आधार कार्डचा डेटा सहज उपलब्ध होऊ शकतो, ज्याच्या आधारे ते लोकांची माहिती सांगून चमत्काराचा बनाव रचतात.
यावेळी श्याम मानव यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. राज्यात कायद्याचा वापर सिलेक्टिव्ह पद्धतीने केला जात आहे. जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असतानाही धीरेंद्र शास्त्रींसारख्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी सरकार त्यांना संरक्षण देत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर अशा बाबांच्या पाया पडत असतील, तर त्यांनी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा अधिकार त्यांनी गमावला आहे. कोणत्याही डॉक्टरची पदवी नसताना रोगांचे निदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे, तरीही ‘दिव्य दरबारा’च्या नावाने हा फसवणुकीचा धंदा उघडपणे सुरू आहे, असे त्यांनी सुनावले.
Bacchu kadu : बच्चू कडूंचा अखेर ‘यू-टर्न’; ‘प्रहार’चा बाणा बाजूला सारत बांधले शिवबंधन
अशोक खरातप्रमाणेच हा बाबा देखील एक दिवस उघडा पडेल. एकही ढोंगी बाबा स्त्रियांच्या भानगडीशिवाय राहू शकत नाही, हा ही बाबा तोच उपद्व्याप करणार आहे, असे भाकीतही श्याम मानव यांनी वर्तवले. आमचा विरोध रामकथेला नसून, चमत्काराचे दावे करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या ‘दिव्य दरबारा’ला आहे आणि हा लढा आपण अधिक तीव्र करणार असल्याचे श्याम मानव यांनी स्पष्ट केले.








