व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Big blow to Eknath Shinde shivsena : शिंदेसेनेला मेहकरात मोठा धक्का? काँग्रेसच्या...

Big blow to Eknath Shinde shivsena : शिंदेसेनेला मेहकरात मोठा धक्का? काँग्रेसच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली

Nine out of 11 Congress councillors extend support to Uddhav Thackeray’s Shiv Sena : मेहकरात काँग्रेस-उद्धवसेना एकत्र; ९ नगरसेवकांच्या पाठिंब्याने बदलली राजकीय समीकरणे

Mehkar मेहकर नगरपालिकेच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून काँग्रेसच्या ११ पैकी ९ नगरसेवकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे नगरपालिकेतील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत आहे.

पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी ९ नगरसेवकांच्या स्वाक्षरीच्या समर्थनपत्राद्वारे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला. या घोषणेनंतर मेहकरच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

मेहकर विधानसभा मतदारसंघात आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विजयापासून राजकीय वातावरणात मोठे बदल घडत आहेत. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर नगरपालिकेतील सत्तासमीकरणांमध्येही बदल दिसून येत असून काँग्रेसच्या या पाठिंब्यामुळे उद्धवसेनेची राजकीय ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे.

 

Police Modernization : महाराष्ट्र पोलिस दल आधुनिकीकरणासाठी ७३३.२८ कोटींची योजना मंजूर

काँग्रेस आणि उद्धवसेनेचे मिळून नगरपालिकेत १६ सदस्यांचे संख्याबळ निर्माण झाल्याने महाविकास आघाडीची भूमिका अधिक मजबूत झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, विरोधी राजकीय गटांसाठी ही घडामोड आव्हानात्मक मानली जात असून भविष्यातील राजकीय रणनीतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, विधानसभा निवडणुकीतील विजय, नगराध्यक्षपदावरील नेतृत्व आणि आता काँग्रेसचा मिळालेला पाठिंबा या सलग घटनांमुळे मेहकरमध्ये महाविकास आघाडीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही आघाडी किती प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे गटनेते तथा उपनगराध्यक्ष मोहम्मद अलीम ताहेर, नगरसेविका मंगला मानवतकर, मुजीब हसन कुरेशी, मुजीब खान पठाण, अंजुम बानो कुरेशी, शबनूर बी कुरेशी, सुनीता ढाकरके, वैभव उमाळकर आणि नीलिमा सोमण यांनी समर्थनपत्रावर स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शविला आहे.

error: Content is protected !!