व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने राजकारणासाठी लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला; बावनकुळेंचा नागपुरातून हल्लाबोल!

Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने राजकारणासाठी लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला; बावनकुळेंचा नागपुरातून हल्लाबोल!

Chandrashekhar Bawankule criticises Congress, alleging betrayal of Ladkya Bahin for political gains : वंचित घटकांतील महिलांना प्रगतीपासून रोखण्याचे पाप, विरोधकांवर टीका

Nagpur केंद्र सरकारने मांडलेले महिला आरक्षण विधेयक रोखल्याने भाजप नेत्यांमध्ये संतापाची लाट आहे. या मुद्द्यावरून आता देशभर भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगला आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना संसदेत मोठी संधी उपलब्ध करून दिली असताना, अनुसूचित जाती, ओबीसी आणि इतर वंचित घटकांतील महिलांना प्रगतीपासून रोखण्याचे पाप काँग्रेसने केले आहे. काँग्रेसने केवळ राजकारण करण्यासाठी लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला आहे, अशी घणाघाती टीका बावनकुळे यांनी केली. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले असून, भाजपने आता या विषयावरून महिलांची सहानुभूती मिळवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Sudhir Mungantiwar : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा; बेलसनी प्रदूषण प्रकरणी सुधीर मुनगंटीवार आक्रमक

केवळ आरक्षणच नव्हे, तर राज्यातील इतर संवेदनशील मुद्यांवरही बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी मुलींच्या बेपत्ता प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची सर्व माहिती गृह खात्याकडे असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात लक्ष घालून आहेत. विदर्भातील हा अतिशय गंभीर प्रश्न असल्याने आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आपण स्वतः यावर देखरेख ठेवून आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, नागपूरमधील रियाज काजी धर्मांतरण प्रकरणात पोलिसांनी वेळेत कठोर कारवाई केल्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे त्यांनी नमूद केले.

Ips transfer आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच !

दरम्यान, अमरावतीच्या परतवाडा प्रकरणाबाबत त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले. जोपर्यंत अधिकृत माहिती समोर येत नाही, तोपर्यंत कोणीही आरोप-प्रत्यारोप करू नयेत. अशा संवेदनशील विषयांमुळे दोन धर्मांत तेढ निर्माण होऊन अमरावतीचे वातावरण बिघडू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले. याचसोबत, उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर मातंग समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सरकार योग्य तो सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासनही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.

error: Content is protected !!