व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Chandrashekhar Bawankule : कामात ढिलाईला चाप! बावनकुळे यांची ‘ऑन द स्पॉट’ कारवाई;...

Chandrashekhar Bawankule : कामात ढिलाईला चाप! बावनकुळे यांची ‘ऑन द स्पॉट’ कारवाई; एसडीओंना सक्तीची रजा

Chandrashekhar Bawankule Takes ‘On-the-Spot’ Action; SDO Sent on Compulsory Leave : चिखलीत प्रशासनाला धक्का; महसूलमंत्र्यांचा कडक पवित्रा, अधिकाऱ्यांवर थेट कारवाई

Chikhli महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिखलीत घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी ढिसाळ होत असल्याचे उघड होताच त्यांनी तातडीने ‘ऑन द स्पॉट’ कारवाई करत उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. या निर्णयामुळे स्थानिक प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, यंत्रणेला धक्का बसला आहे.

आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महसूल विभागातील प्रलंबित कामे, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी अनेक प्रकरणांत अनावश्यक दिरंगाई होत असल्याचे आणि सामान्य नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे मंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आले.

Revenue department : महसूल दाखल्यांत मोठा बदल; ‘युनिक फॉरमॅट’मुळे राज्यभर एकसमान सेवा’

यावर संतप्त प्रतिक्रिया देत त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी आहे; आदेशांचे पालन न करणाऱ्या आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.”

घरांचे पट्टे व मालकी हक्क देण्याच्या महत्त्वाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणीच न झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यांनी तत्काळ निर्णय घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली. या निर्णयाकडे केवळ प्रशासकीय शिस्तीचा भाग म्हणून नव्हे, तर आगामी काळातील प्रशासनावर नियंत्रण मजबूत करण्याच्या राजकीय संदेशाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.

Pratibha Dhanorkar : चंद्रपुरात राजशिष्टाचाराचा धुराळा; खासदार प्रतिभा धानोरकरांचे भर कार्यक्रमातून ‘वॉकआऊट’, प्रकरण थेट दिल्लीत

दरम्यान, आमदार श्वेता महाले यांनी स्थानिक पातळीवरील विविध समस्या मांडत नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्याची गरज अधोरेखित केली. नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेत मंत्री बावनकुळे यांनी प्रत्येक प्रकरणावर वेळबद्ध कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

या दौऱ्यातून सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचा संदेश देत असतानाच, प्रशासनातील ढिलाई सहन केली जाणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे चिखलीतील ही कारवाई आता राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

error: Content is protected !!