व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Congress on Vote Theft : ‘व्होट चोरी’चा मुद्दा खेडोपाडी नेण्याचा निर्णय

Congress on Vote Theft : ‘व्होट चोरी’चा मुद्दा खेडोपाडी नेण्याचा निर्णय

Decision to telecast Rahul Gandhi’s press conference in villages : काँग्रेसची रणनीती बैठक; राहुल गांधी यांची पत्रकार परिषदही दाखवणार

Amravati आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस खासदार बळवंतराव वानखडे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उजेडात आणलेल्या ‘व्होट चोरी’ प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. हा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवून, गत निवडणुकांतील वास्तव जनतेसमोर मांडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Vote Theft : ‘मतदान चोर, खुर्ची सोड’, काँग्रेसचा कॅन्डल मार्च मोर्चा

या वेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारांबाबत लोकांना जागरूक करणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. यासाठी गावोगावी आणि शहरांमध्ये राहुल गांधी यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेचे प्रक्षेपण मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

बैठकीदरम्यान संघटनात्मक बळकटीसाठी नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. शोएब खान यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, तर पवन बेलसरे यांची शेंदुरजनाघाट शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसचे संघटन अधिक सक्षम होईल, असा विश्वास जिल्हा काँग्रेसने व्यक्त केला.

Maharashtra politics : राज्यात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरू

या बैठकीस माजी आमदार प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप, हरिभाऊ मोहोड, सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे, दयाराम काळे, बाळासाहेब हिंगणीकर, मुकद्दर खा पठाण, मुकुंद देशमुख, सेतू देशमुख, प्रदीप देशमुख, रामेश्वर अभ्यंकर, संजय नागोणे, वीरेंद्र जाधव, राजेंद्र नागपुरे, श्रीकांत झोडपे, नामदेव तनपुरे, वासंतीताई मंगरोळे, सचितानंद बेलसरे, बिट्टू मांगरोळे, वैभव वानखडे, सहदेव बेलकर, विनोद पवार, सागर देशमुख, विलास बोरेकर, राजेश सेमलकर, सिद्धार्थ बोबडे, राहुल बोडखे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!