व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Crime in Amravati : नगरसेविकेच्या पतीला मागितली ५० लाखांची खंडणी, पोलिस ठाण्यातच...

Crime in Amravati : नगरसेविकेच्या पतीला मागितली ५० लाखांची खंडणी, पोलिस ठाण्यातच धमकी

₹50 lakh extortion demand from a corporator’s husband; threat issued inside the police station itself : तक्रार मागे घेण्यासाठी दबाव, पानटपरी चालकावर हल्ला

Amravati बडनेरा परिसरात खंडणी आणि मारहाणीच्या दोन परस्परविरोधी गुन्ह्यांमुळे खळबळ उडाली आहे. प्रभाग क्र. २१च्या नगरसेविका नुजहत परवीन यांच्या पतीला भररस्त्यात अडवून ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली, तर पोलिस ठाण्याच्या आवारातच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी नगरसेविका नुजहत परवीन यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी मुमताज अकबर खान (४४), फिरोज खान अकबर खान व अन्य ३ ते ४ जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ, मारहाण, धमकी आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, नगरसेविकेचे पती शाकीर हुसेन हे नमाज अदा करून परतत असताना आरोपींनी त्यांना अडवून ५० लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे, पीडित कुटुंब तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचल्यावरही आरोपींनी तेथेच शाकीर हुसेन यांना धमकावल्याचा आरोप आहे.

Shyam Manav controversy : संत गुलाब बाबांबद्दल आक्षेपार्ह विधान; श्याम मानव यांच्यावर फौजदारी कारवाई करा, नागपुरातून उमटले तीव्र पडसाद

दरम्यान, या प्रकरणात दुसरी बाजूही समोर आली आहे. एहफाज खान तजिम खान (३१, रा. बडनेरा) यांच्या तक्रारीवरून २५ एप्रिल रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास नगरसेविका नुजहत परवीन यांचे पती शाकीर हुसेन अहमद हुसेन, आतिफ जुबेर शाह, राजिक मास्टर (रा. बडनेरा), हाजी इरफान (रा. नागपुरी गेट) व इतरांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudhir Mungantiwar : गरिबांच्या सन्मानार्थ, युवा वॉरियर्स मैदानात; मुनगंटीवारांनी दिला तरुणांना कानमंत्र

 

एहफाज खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निवडणूक आयोगाकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींकडून दबाव टाकण्यात आला. पानटपरीवर असताना आरोपींनी त्यांना धमकावले आणि शिवीगाळ केली. वाद सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या काकांवरही हल्ला करण्यात आला असून बोथट वस्तूने मारहाण करून त्यांना जखमी केल्याचे नमूद आहे. या दोनही प्रकरणांमुळे बडनेरा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

error: Content is protected !!