व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nagpur Municipal corporation : एमआयएमचा अंतर्गत ‘सौदा’ चव्हाट्यावर; गटनेत्यावर दीड कोटींचा आरोप,...

Nagpur Municipal corporation : एमआयएमचा अंतर्गत ‘सौदा’ चव्हाट्यावर; गटनेत्यावर दीड कोटींचा आरोप, ५ कोटींच्या मानहानीचा दावा!

Factional split within AIMIM over the selection of a nominated member; dispute reaches court : स्वीकृतचा वाद न्यायालयात, सदस्याच्या निवडीवरून पक्षात दोन गट

Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य पदावरून एमआयएममधील (MIM) अंतर्गत कलह आता टोकाला पोहोचला असून, हा वाद थेट कायदेशीर लढाईपर्यंत जाऊन पोहोचला आहे. स्वीकृत सदस्याच्या निवडीवरून पक्षात दोन गट पडले असून, गटनेते शकील पटेल यांनी ही जागा दीड कोटी रुपयांत विकल्याचा खळबळजनक आरोप फहीम अंसारी यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांमुळे आपली आणि पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याचे सांगत शकील पटेल यांनी अंसारी यांना ५ कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

नागपूर महापालिकेत एमआयएमचे ६ आणि मुस्लिम लीगचे ४ अशा १० नगरसेवकांच्या बळावर पक्षाला एक स्वीकृत सदस्य मिळण्याची संधी होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी प्रचंड गोंधळ उडाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी फहीम अंसारी यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले होते.

Akola Airport : शिवणी विमानतळाला ‘श्री संत गजानन महाराज’ नाव देण्याची मागणी; मुख्यमंत्र्यांचे केंद्राला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश

तरीही गटनेते शकील पटेल यांनी काँग्रेसचे निलंबित पदाधिकारी नरेंद्र जिचकार यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. ऐनवेळी झालेल्या या वादावादीमुळे आणि गटनेत्याकडून अधिकृत पत्र न मिळाल्याने एमआयएमला एकही अर्ज दाखल करता आला नाही, परिणामी हक्काची एक जागा रिक्त राहिली.

या प्रकारानंतर संतापलेल्या फहीम अंसारी यांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर शकील पटेल यांच्याविरोधात मोहीम उघडली. पटेल यांनी दीड कोटी रुपयांच्या बदल्यात पक्षाची जागा विकल्याचा आणि गद्दारी केल्याचा आरोप त्यांनी केला. या संदर्भातील एक १८ सेकंदांची ऑडिओ क्लिपही प्रसारित झाली असून त्यात पटेल यांना ‘गद्दार’ संबोधण्यात आले आहे.

Eknath Shinde Shivsena : नाराज नवलेंची काढली समजूत, राजीनामा नामंजूर!

याप्रकरणी शकील पटेल यांनी ॲड. आबिद खान यांच्यामार्फत अंसारी यांना नोटीस पाठवून ४८ तासांत जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे, अन्यथा ५ कोटींचा दावा दाखल करण्याची तंबी दिली आहे. या राजकीय पेचप्रसंगामुळे पक्षाची मोठी नाचक्की झाली असून, पक्ष नेतृत्वाने दोन्ही गटांना चर्चेसाठी छत्रपती संभाजीनगर येथे बोलावले आहे.

error: Content is protected !!