व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Shivsena Eknath Shinde : काय सांगता! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची...

Shivsena Eknath Shinde : काय सांगता! शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची ‘ऑफर’?

Eknath Shinde Shivsena offers a Legislative Council seat to Bacchu Kadu : शिंदे-कडू बैठकीत निर्णय?; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी राजकारणाला वेगळं वळण

Amravati राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याचे खुद्द कडू यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत शिंदे आणि कडू यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवर चर्चा झाली. शिंदे गटाच्या शिवसेनेकडून दोन जागा लढवल्या जाणार असून, त्यापैकी एका जागेसाठी कडू यांना प्रस्ताव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Amravati Municipal Corporation : ‘सेटिंग’च्या आरोपाने सभागृहात गदारोळ; ३०० कोटींच्या भ्रष्टाचार चौकशीची मागणी

१२ मे रोजी मतदान
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक 2026 अंतर्गत एकूण १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये ९ जागांसाठी नियमित निवडणूक, तर १ जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
अधिसूचना : २३ एप्रिल २०२६
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : ३० एप्रिल
छाननी : २ मे
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ४ मे
मतदान : १२ मे (सकाळी ९ ते सायं. ४)
मतमोजणी : १२ मे सायंकाळी ५ वाजता

Asha sevika : अत्यल्प मानधनात २४ तास सेवा, आशा सेविकांचे मानधन ६ महिन्यांपासून थकीत

विधान परिषदेत एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे भाजप (१३१), शिवसेना (५७) आणि राष्ट्रवादी (४०) असे एकूण भक्कम संख्याबळ असल्याने त्यांच्या ८ उमेदवारांचा मार्ग सुकर मानला जात आहे. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ सुमारे ४६ असल्याने त्यांना एका जागेवरच समाधान मानावे लागू शकते.

शिवसेनेकडून बच्चू कडू यांना प्रस्ताव दिल्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. कडू या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतात आणि पुढील भूमिका काय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!