व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Devendra Fadnavis : महायुतीला धक्का देणाऱ्या गोकुळ गितेंच्या घरी फडणवीसांची अचानक एन्ट्री

Devendra Fadnavis : महायुतीला धक्का देणाऱ्या गोकुळ गितेंच्या घरी फडणवीसांची अचानक एन्ट्री

devendra-fadnavis-gokul-gite-nashik-political-meeting : राखीच्या निमित्ताने भेट, राजकारणात चर्चांना उधाण

Nashik : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला धक्का देत राजकीय समीकरणे बदलणारे शिवसेनेचे सहयोगी सदस्य गोकुळ गिते यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक भेट दिल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नाशिक दौऱ्यावर असताना शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांनी गिते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

विशेष म्हणजे, विधान परिषद निवडणुकीच्या काळात गिते बंधूंच्या भूमिकेमुळे नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. एकीकडे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गणेश गिते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या आग्रहाचा मान ठेवत निवडणुकीतून माघार घेतली होती. दुसरीकडे गोकुळ गिते यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात गोकुळ गिते यांनी प्रचारापासून दूर राहण्याची भूमिका घेतल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्ष निकालानंतर महायुतीच्या प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि गोकुळ गिते यांचे नाव राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून भूमिका स्वीकारली.

Sanjay Raut : टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय कोणाच्या आदेशावरून फिरवला?

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ गिते यांच्या निवासस्थानी दिलेली भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. निवडणुकीच्या काळात झालेल्या माघारीच्या नाट्यावेळी फडणवीस यांनी नाशिकला आल्यानंतर गोकुळ गिते यांच्या घरी सदिच्छा भेट देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळल्याचे गिते यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या भेटीला मात्र केवळ राजकीय भेटीचे स्वरूप राहिले नाही. गिते कुटुंबीयांनी रक्षाबंधनाचा सणही यावेळी साजरा केला. आमदार गोकुळ गिते आणि गणेश गिते यांच्या पत्नी तसेच भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली. त्यामुळे राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला कौटुंबिक आणि भावनिक रंगही मिळाला.

Government Decision : मोठी बातमी! जरांगे यांच्या आंदोलनाच्या एक दिवस आधीच सरकारचा मोठा निर्णय

मात्र, दोन महिन्यांपूर्वी महायुतीच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का देणाऱ्या गोकुळ गिते यांच्या घरी मुख्यमंत्री फडणवीस स्वतः पोहोचल्याने राजकीय वर्तुळात या भेटीचा संदेश काय, यावर चर्चा सुरू झाली आहे. गिते बंधूंची राजकीय भूमिका, गणेश गिते यांची निवडणुकीतील माघार, गोकुळ गिते यांची स्वतंत्र भूमिका आणि त्यानंतर झालेला महायुतीच्या उमेदवाराचा पराभव या घटनांमुळे नाशिकच्या राजकारणात आधीच उत्सुकता निर्माण झाली होती. आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः गोकुळ गिते यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने या जुन्या राजकीय घडामोडींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.

या भेटीमागे कोणताही राजकीय संदेश आहे का, भविष्यात गोकुळ गिते आणि महायुती यांच्यातील संबंधांमध्ये काही नवे समीकरण तयार होणार आहे का, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी ही भेट असल्याचे गिते यांच्या निकटवर्तीयांकडून स्पष्ट करण्यात येत असल्याने या भेटीचा नेमका राजकीय अर्थ लावण्यासाठी पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
___

error: Content is protected !!