व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Devendra Fadnavis: नरसापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला फासावर लटकवणारच

Devendra Fadnavis: नरसापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला फासावर लटकवणारच

will ensure that the perpetrator in the Narsapur assault case is hanged, asserts the Chief Minister : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पीडित कुटुंबाला शब्द

Nagpur पुण्यातील नरसापूर येथे घडलेल्या अमानवीय घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. या प्रकरणातील नराधमाला कायद्यानुसार मृत्युदंडाचीच शिक्षा मिळावी, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून अत्यंत वेगाने चालवला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः पीडित मुलीच्या वडिलांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना सरकारतर्फे लेखी पत्र पाठवून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाहीत जरी जनतेची भावना नराधमाला चौकात फाशी देण्याची असली, तरी देश कायद्याने चालतो. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कायद्याचा दुरुपयोग होऊ दिला जाणार नाही आणि संबंधित नराधमाला मरेपर्यंत फाशीच दिली जाईल यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.

Tcs crime news : पेयातून गुंगीचं औषध देत महिलांचं शोषण धर्मांतर रॅकेटच्या संशयाने खळबळ

आरोपीच्या आधीच्या गुन्ह्यांचीही सखोल चौकशी सुरू असून, तांत्रिक आणि कायदेशीर पुराव्यांच्या आधारे तो कोणत्याही स्थितीत सुटणार नाही याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान, पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन केले. नागरिकांचा संताप स्वाभाविक असला तरी, काही लोक या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्यांना वेठीस धरत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांना कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांची माहिती सरकारकडे असून सध्या त्यांच्यावर कारवाईची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Iran war threat : ट्रम्प यांच्या युद्धाच्या इशाऱ्याने जग हादरलं!

अत्यंत दुःखद प्रसंगातही संयम राखून सरकारला सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पीडित मुलीच्या वडिलांचे आभार मानले. आम्ही पूर्ण ताकदीनिशी पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत आणि या नराधमाला त्याच्या कृत्याची कठोरतम शिक्षा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. नागपूर येथील लक्ष्मीनारायण टेक्नॉलॉजी इंटिस्ट्यूटच्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

error: Content is protected !!