व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath Khadse: भाजपच्या कार्यकर्त्यांना मी हवाय, पण काही नेत्यांना नको!, अमृत महोत्सवी...

Eknath Khadse: भाजपच्या कार्यकर्त्यांना मी हवाय, पण काही नेत्यांना नको!, अमृत महोत्सवी सत्कारात एकनाथ खडसेंची खंत

Eknath Khadse expresses his resentment towards BJP leaders during his Amrit Mahotsav felicitation : भाजपमधील अंतर्गत विरोधावर केले भाष्य

Mumbai भाजपचा सामान्य कार्यकर्ता मला आजच काय, उद्याही पक्षात घ्यायला तयार आहे; पण पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना मात्र मी पक्षात नको आहे, अशा थेट आणि तिखट शब्दांत शरद पवार गटाचे नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

जळगावात आयोजित अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात बोलताना नाथाभाऊंनी भाजपमधील अंतर्गत विरोधावर बोट ठेवत पुन्हा एकदा आपल्यावरील अन्याया’चा पाढा वाचला. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या काळात भाजपचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडसेंनी पक्षाच्या विस्तारात मोलाचे योगदान दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात महसूलमंत्री, तर युती सरकारमध्ये जलसंपदा मंत्रिपद भूषवलेले खडसे एकेकाळी राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात होते. मात्र, भोसरी जमीन घोटाळ्याच्या आरोपांनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तेथूनच खडसे एकाकी पडले. पक्षांतर्गत डावलले गेल्यानंतर मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे वक्तव्य खडसेंनी केले होते, आणि हीच बाब पक्षातील काही बड्या नेत्यांना खटकल्याने त्यांना जाणीवपूर्वक मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्यात आल्याचे बोलले जाते.

Shivsena Verdict : “पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच”

लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी खडसेंना पुन्हा पक्षात घेण्याची अधिकृत घोषणा केली होती. मात्र, जळगावच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांचे हनुमान म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी असलेले टोकाचे मतभेद आणि पक्षातील अंतर्गत विरोधामुळे खडसेंचा अधिकृत पक्षप्रवेश अद्यापही लटकलेलाच आहे. त्यांची स्नुषा भाजपची खासदार असूनही खडसेंना मात्र भाजपच्या दारात ताटकळत राहावे लागत आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री जयंत पाटील यांनी या कार्यक्रमात खडसेंचे भाजपच्या उभारणीतील योगदान मान्य करत त्यांना शुभेच्छा दिल्या असल्या, तरी कार्यकर्त्यांची साथ असूनही नेत्यांची नाकेबंदी सुटणार कधी आणि नाथाभाऊंचा भाजपमधील ताटकळणारा पक्षप्रवेश कधी पूर्ण होणार हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

error: Content is protected !!