Resolve to strengthen Shivsena across Akola district : ‘गाव तेथे शाखा, शाखा तेथे बूथ प्रमुख’ अभियान राबवणार
Akola शिवसेना ही केवळ पक्षाचे नाव नसून सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारी एक चळवळ आहे. अकोला जिल्ह्यात शिवसेना मोठ्या ताकदीने वाढत असून भविष्यात जनसामान्यांची हक्काची संघटना म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा विशेष प्रभारी ललित वानखडे यांनी केले.
अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख अश्विन नवले, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, जिल्हाप्रमुख मंगेश काळे, महिला सेना जिल्हाप्रमुख उषाताई विरक, जिल्हा समन्वयक डॉ. अशोक ओळंबे आणि महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
ADCC Bank : एडीसीसी बँकेच्या विशेष सभेला उच्च न्यायालयाचा स्थगितीचा फटका
मार्गदर्शन करताना अश्विन नवले म्हणाले की, शिवसैनिक हा नेहमी जनतेच्या प्रश्नांसाठी सज्ज असला पाहिजे. सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कांसाठी त्याने सातत्याने संघर्ष केला पाहिजे.
माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी “गाव तेथे शाखा, शाखा तेथे बूथ प्रमुख” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी अकोला जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त करत 2029 पर्यंत जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
Rajiv potdar: काँग्रेसचे दावे फोल; भाजपचे राजीव पोतदार, अविनाश ब्राम्हणकर विजयी
नवनियुक्त जिल्हा समन्वयक डॉ. अशोक ओळंबे यांनी बूथस्तरावरील कार्यकर्त्यांचा सन्मान कायम राखत कार्यकर्ता आणि नेतृत्व यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याचे आश्वासन दिले. महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांनी “वाडा तेथे बूथ प्रमुख” ही संकल्पना महानगरात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाला प्रा. प्रकाश डवले, संतोष अनासने, योगेश अग्रवाल, माजी नगरसेवक गजानन चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.








