व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश ‘GST Festival ; :सोमवारपासून भाजपचा ‘जीएसटी बचत महोत्सव’

‘GST Festival ; :सोमवारपासून भाजपचा ‘जीएसटी बचत महोत्सव’

MP to hold a walking tour in the market : खासदार बाजारात काढणार पायी फेरी

New Delhi : देशभरात जीएसटी सुधारणा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपतर्फे विशेष मोहिम राबवली जाणार आहे. २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान ‘जीएसटी बचत महोत्सव’ आयोजित केला जाणार असून या आठवडाभराच्या अभियानात भाजपचे खासदार स्वतःच्या मतदारसंघातील बाजारपेठांमध्ये पायी फेरी काढून जनतेशी थेट संवाद साधणार आहेत.

२२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन जीएसटी रचनेत प्रामुख्याने दोनच दर ठेवले गेले आहेत ५ टक्के आणि १८ टक्के. तर आलिशान आणि विलासी वस्तूंवर स्वतंत्र ४० टक्के कर आकारला जाणार आहे. तंबाखू व संबंधित उत्पादने मात्र २८ टक्क्यांपेक्षा अधिक उपकराच्या श्रेणीतच राहतील. सध्या ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार करस्लॅब आहेत, मात्र आता ती संख्या कमी करण्यात आली आहे.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्ह्याला मिळणार मुबलक युरीया, मुनगंटीवारांनी दिले निर्देश !

या पार्श्वभूमीवर भाजपचा ‘जीएसटी बचत महोत्सव’ व्यापार्‍यांना, दुकानदारांना आणि ग्राहकांना जीएसटीचे फायदे समजावून सांगण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पक्ष कार्यकर्ते व नेते मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होणार आहेत.

Chandrashekhar Bawankule : तुम्ही काय दिवे लावले, हे माहिती आहे !

 

सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की नवीन दर लागू झाल्यानंतर त्याचा संपूर्ण लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवला जावा. व्यवसायांनी तातडीने आपले सिस्टीम अपडेट करून पुरवठा साखळीत नवीन दरानुसार किंमत ठरवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या माध्यमातून भाजप छोट्या व्यावसायिकांशी थेट संपर्क प्रस्थापित करून आर्थिक सुधारणांचे फायदे जनतेपर्यंत] पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

____

error: Content is protected !!