political equations revolve around the Bajoria father-son duo in legislative election : हिंगोली-परभणीत अजित पवार गट आक्रमक; अमरावतीतही उमेदवारीवरून महायुतीत खलबते
Akola विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हिंगोली-परभणी मतदारसंघात अजित पवार गटाने जोरदार दावा केल्यानंतर आता अमरावती विभागातही उमेदवारीवरून महायुतीतील समीकरणे बदलत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विशेषतः शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार नितीन बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया या पिता-पुत्रांच्या राजकीय हालचालींमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
हिंगोली-परभणी विधान परिषद मतदारसंघात मागील वेळी विजय मिळवलेले नितीन बाजोरिया पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने या जागेवर दावा केल्यानंतर महायुतीतील जागावाटप अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. भाजपमधील काही प्रभावी नेत्यांचाही या समीकरणांवर प्रभाव असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Eknath shinde : गुप्त दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीची जोरदार चर्चा
दरम्यान, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अमरावती विभागात पुन्हा राजकीय संपर्क वाढविल्याचे दिसून येत आहे. विविध नेत्यांच्या भेटीगाठी, कार्यकर्त्यांशी संवाद आणि मतदारसंघातील हालचालींमुळे त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चांनाही वेग आला आहे. त्यामुळे महायुतीतील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे सांगितले जात आहे.
Mlc election : महायुतीत राजकीय हालचालींना वेग! मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटातील काही नेत्यांनी नितीन बाजोरिया यांच्या उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र दुसरीकडे अजित पवार गटानेही आपली भूमिका अधिक आक्रमक केली आहे. त्यामुळे अंतिम उमेदवारी कोणाच्या पारड्यात पडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीतील या घडामोडींमुळे अमरावती विभागातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काही दिवसांत मोठे राजकीय निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








