व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Loan Waiver : तरुण शेतकऱ्याने स्वतःचीच दुचाकी पेटवली, सरकारवर संताप

Loan Waiver : तरुण शेतकऱ्याने स्वतःचीच दुचाकी पेटवली, सरकारवर संताप

Farmer sets his own two-wheeler on fire to demand a blanket farm loan waiver : सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे वाशिममध्ये आंदोलन

Washim कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी या योजनेतील जाचक अटी व शर्तींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफीची मागणी जोर धरत असून, राज्यभर आंदोलनांचे लोण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे एका संतप्त शेतकऱ्याने शासनाच्या निषेधार्थ भररस्त्यात स्वतःची दुचाकी पेटवून आंदोलन केले.

राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लागू होणार आहे. मात्र, योजनेत घालण्यात आलेल्या विविध तांत्रिक अटींमुळे बहुतांश गरजू शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. याच कारणावरून विविध संघटनांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत सरसकट कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे.

Viplav Bajoriya : विप्लव बाजोरिया प्रकरणाची आज हायकोर्टात सुनावणी; मतदानाच्या पूर्वसंध्येला निर्णयाकडे लक्ष

याआधी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे आंदोलन छेडले असून, त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.

रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी सतीश इडोळे या तरुण शेतकऱ्याने संताप व्यक्त करत स्वतःची दुचाकी भरचौकात आणून पेटवून दिली.

Big blow to Eknath Shinde shivsena : शिंदेसेनेला मेहकरात मोठा धक्का? काँग्रेसच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली

सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी इडोळे यांच्यासह उपस्थित आंदोलकांनी केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दुचाकी जाळल्यानंतर आंदोलकांनी सरकारला इशाराही दिला. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत तातडीने सरसकट कर्जमाफी लागू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

error: Content is protected !!