व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Elections : ‘मतचोरी’चा स्फोटक मुद्दा महाविकास आघाडीला फायदा करून देणार...

Local Body Elections : ‘मतचोरी’चा स्फोटक मुद्दा महाविकास आघाडीला फायदा करून देणार ?

From Congress to MNS, everyone has the same accusation; Will they put BJP in trouble in the upcoming elections : काँग्रेसपासून मनसेपर्यंत सर्वांचा एकच आरोप; आगामी निवडणुकांत भाजपला अडचणीत आणणार का ?

Nagpur : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. अशाl राजकीय तापमान पुन्हा एकदा शिगेला पोहोचले. महाराष्ट्रात मतचोरी हा शब्दच महाविकास आघाडीच्या राजकीय रणनीतीचा केंद्रबिंदू बनला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुराव्यांसह आरोपांची सुरुवात केली तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आरोपांच्या फैरी झाडून भाजपवर थेट निशाणा साधला.

मतचोरीच्या आक्रमक आरोपामुळे राजकीय वर्तुळात हलकल्लोळ माजला. मतचोरीचा मुद्दा महाविकास आघाडीला किती फायदा करून देणार, हा प्रश्न आता चहूबाजूंनी विचारला जात आहे. या आरोपांना सर्वाधिक वजन मिळाले ते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या थेट आणि गंभीर दाव्यामुळे. काटोल विधानसभा मतदारसंघात तब्बल ३५ हजार ५३५ मतांची चोरी झाली आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचे उमेदवार सरील देशमुख पराभूत झाले, असा स्फोटक आरोप देशमुख यांनी केला. राज्याच्या राजकारणात असा मोठा आकडा आणि थेट निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाल्याचा दावा दुर्मिळ आहे आणि तोच आता महाविकास आघाडीच्या नॅरेटिव्हचा गाभा बनला आहे.

Dr. Mohan Bhagwat : भारताने जगाला विविधतेचे व्यवस्थापन शिकवावे !

लोकशाहीशी जोडलेला मुद्दा..
भारतीय जनता पक्षाने या आरोपांना राजकीय खोटारडेपणा म्हटले असे असले तरी महाविकास आघाडीला हवे तेच मिळत आहे. एक भावनिक जनआकर्षक आणि स्फोटक मुद्दा प्रभावी ठरणार, असे बोलले जात आहे. याशिवाय वाढती महागाई, वाढलेले वीजदर, शेतकऱ्यांची नाराजी आणि स्थानिक सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मतचोरी हा थेट लोकशाहीशी जोडलेला मुद्दा आहे त्यामुळे या मुद्द्याला सामान्य मतदारांकडून सहानुभूती मिळण्याची मोठी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.

सत्ताधाऱ्यांच्या गोटात भीती..
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशावेळी महाविकास आघाडीने हा मुद्दा रोखठोकपणे आणि आक्रमकपणे सातत्याने मांडला आहे. मतदारांची नाराजी वाढत असताना आपले मत चोरले गेले, हे कथन जनमाणसांत घर करू लागल्यास त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसेल, याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘संविधान धोक्यात’, हा मुद्दा उचलून काँग्रेसने चागलं यश मिळवलं होतं. सत्ताधाऱ्यांच्या गोठातही हीच भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.

Local Body Elections : एकनाथ शिंदे यांनी नागपूर जिल्ह्यासाठी केल्या जबाबदाऱ्या निश्चित !

राजकीय भुचाल..
थोडक्यात मतचोरी हा महाविकास आघाडीने पकडलेला मुद्दा राजकीय दृष्ट्या धारधार हत्यार बनत चालला आहे. हा मुद्दा भाजपची प्रतिमा डळमळीत करण्यास आणि महाविकास आघाडीला स्थानिक निवडणुकात बळ देण्यास पुरेसा ठरेल का? राजकारणात काही निश्चित नसले तरी एवढे मात्र निश्चित आहे की, महाराष्ट्रातील पुढील काही महिने मतचोरीच्या राजकीय भूचालाने हादरणार आहेत.

error: Content is protected !!