The tug-of-war and secret politics have begun : जि.प. इच्छुकांची धावपळ, रस्सीखेच आणि गुप्त राजकारणाला सुरुवात
Chikhli पालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी वाटपाच्या नाट्यमय घडामोडींनी अनेक इच्छुकांना कडू अनुभव दिला. चिखली आणि अन्य नगरपालिकांमध्ये उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत झालेली रस्सीखेच, पक्षांतर्गत असंतोष आणि एबी फॉर्मच्या गुप्ततेमुळे झालेले राजकीय उलथापालथ अद्यापही चर्चेत आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या अनुभवातून ‘मोठा धडा’ घेतल्याची लक्षणे दिसत आहेत.
‘झालं गेलं, गंगेला मिळालं’ म्हणत पालिका निवडणुकीवर पडदा पडला असला तरी जि.प. निवडणुकीच्या उमेदवारीत हेच नाट्य रंगल्यास आपला पत्ता कट होईल, या भीतीने इच्छुकांनी आतापासूनच ‘पुढच्याला ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीची अंमलबजावणी सुरू केली आहे.
महापालिका आधी की जिल्हा परिषद—या संभ्रमात प्रशासन असले तरी इच्छुक मात्र आधीच मैदानात उतरले आहेत. तिकीट निश्चितीवर विसंबून न राहता ते विविध पक्षांशी संपर्क, जवळीक आणि सोयीस्कर समीकरणांची चाचपणी करताना दिसत आहेत.
Winter session : विरोधकांच्या टीकेला फडणवीसांकडून जशास तसे उत्तर
पालिका निवडणुकीत उमेदवारीचा शब्द देऊन अर्ज भरायला लावले, पण शेवटच्या दिवशी एबी फॉर्म न देता अनेकांचा पत्ता कट केला—या ताज्या आठवणींमुळे आता जि.प. इच्छुक सावध झाले आहेत.
पालिका निवडणुकीत सर्वच ठिकाणी एकच चित्र दिसले. शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीबाबत पक्षांकडून टोलवाटोलवी करण्यात आली. ‘उमेदवारी तुमची पक्की’ असे सांगून अर्ज घेतले. मार्त अर्ज अखेरच्या क्षणी फॉर्म न मिळाल्याने तिळपापड झाला. त्यातून बंडखोरी व पक्षांतराची मालिका सुरू झाली. हीच परिस्थिती जि.प. निवडणुकीतही उद्भवू शकते—या धास्तीने अनेक इच्छुकांनी ‘बी प्लॅन’ तयार केला आहे.
मिनी मंत्रालयातील राजकारणात तिकीट कोणाला मिळेल, याबाबत अनिश्चितता अधिक वाढली आहे. त्यामुळे फक्त शब्दावर विश्वास ठेवायचा नाही, असा निर्धारच जणू सर्वांनी केला आहे. तसेच ज्या पक्षाकडून एबी फॉर्म मिळेल, त्याच्याकडून अंतिम उमेदवारी समजायची, असे चित्र आहे.
Confusion in the voters’ list : अमरावतीत मतदार यादीतील गोंधळ; ९० टक्के मतदारांचे निवासी पत्ते गायब!
पालिका निवडणुकीतील नाट्य पाहून काही नेते आता उपहासाने म्हणताना ऐकू येतात— “बरं झालं गड्या, आधी तुमची निवडणूक झाली! आम्हांला धडा मिळाला!” तथापि, चिखलीसह अन्य नगरपालिकांतील उमेदवार निवड प्रक्रियेत झालेल्या घडामोडी आता जि.प. निवडणुकीत मोठा परिणाम घडवणार, यात शंका नाही.








