व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Local Body Elections : पक्ष विरोधी कारवाई, भाजपची सहा जणांवर कारवाई

Local Body Elections : पक्ष विरोधी कारवाई, भाजपची सहा जणांवर कारवाई

BJP takes action against six executives : मतदानाचा दिवस तोंडावर असताना मोठा निर्णय

Akola वारंवार सूचना देऊनही सातत्याने प्रत्येक निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या बाळापूर येथील पाच पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी सहा वर्षांसाठी पक्षातून हाकलल्याची माहिती दिली. “पक्ष संघटना सर्वात महत्त्वाची असून संघटनेच्या विचारधारेशी गद्दारी करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही,” असा इशाराही शिवरकर यांनी दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय होणार असून पक्षाला जनतेचा ठाम पाठिंबा असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष शिवरकर यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य कार्यकर्ता कोणतीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रहित आणि विकासासाठी काम करतो, आणि त्याच कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपाचा झेंडा जिल्ह्यात फडकत राहील, असे ते म्हणाले.

Prakash Bharsakale : कोरोना काळात माझ्यासोबत काही तरी वाईट घडणार होते

“पक्षविरोधी कारवाई करणारा कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवारांविरोधात काम करणाऱ्या व पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर दिलेल्या अधिकारानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
“पक्ष संघटना प्रथम आहे. स्वार्थासाठी संघटनेच्या ‘आई’शी गद्दारी करणाऱ्यांना पक्षातून वगळले जाईल. कार्यकर्त्यांनी अधिकृत (कमळ चिन्ह) उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने काम करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

बाळापूर नगर परिषद निवडणूक नोव्हेंबर 2025 मध्ये होणार आहे. या निवडणुकीत पक्षविरोधी प्रचार, कटकारस्थान आणि अधिकृत उमेदवारांविरोधात काम केल्याप्रकरणी खालील पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून हाकलण्यात आले आहे :

1. श्री. श्यामराव शेलार – माजी ज्येष्ठ आघाडी अध्यक्ष
2. श्री. रमेश लोहकरे – माजी मंडळ अध्यक्ष
3. श्री. गजानन खारोडे – माजी जिल्हा सदस्य
4. श्री. बंडू यादगिरे – माजी मंडळ सदस्य
5. श्री. मोहन धरमठोक – माजी मंडळ सदस्य

Local Body Elections : नगरसेवक पदाच्या उमेदवार अपघातात ठार!

पुढील सहा वर्षांत या व्यक्तींना कोणत्याही बैठकीचा निरोप दिला जाणार नाही आणि कोणत्याही निवडणूकसंबंधित प्रक्रियेत त्यांचा संबंध राहणार नाही, असे भाजपाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

error: Content is protected !!