व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Manoj jarange : मनोज जरांगेंच्या मागण्यांवर आज निर्णायक बैठक !

Manoj jarange : मनोज जरांगेंच्या मागण्यांवर आज निर्णायक बैठक !

manoj-jarange-maratha-reservation-chhatrapati-sambhajinagar-meeting-government-update : संभाजीनगरात सरकारची हालचाल, मराठा आरक्षणावर तोडग्याची शक्यता

Chhatrapati Sambhajinagar : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून राज्य सरकारसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जरांगे यांच्या उपोषणाला ११ दिवस पूर्ण झाले असून त्यांच्या प्रकृतीची चिंता वाढली आहे. त्यातच राज्यातील विविध भागांत मराठा समाजाकडून आंदोलन, रास्ता रोको आणि बंदची हाक दिली जात असल्याने सरकारच्या हालचालींना वेग आला आहे.

या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात आज सरकारचे प्रतिनिधी, माजी न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. स्मार्ट सिटी कार्यालयात होणाऱ्या या बैठकीला पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

हैदराबाद गॅझेटच्या आधारे उपलब्ध झालेल्या कुणबी नोंदी, तसेच त्या आधारे प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीतून काही ठोस निर्णय होतो का, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

Rohit Pawar. : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण केव्हा?

दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काल छत्रपती संभाजीनगरात येऊन मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यामुळे आजच्या बैठकीत त्यांची उपस्थिती राहणार का, याबाबतही उत्सुकता आहे. बैठकीनंतर सरकारकडून जरांगे यांच्या मागण्यांबाबत कोणती भूमिका जाहीर केली जाते आणि त्यावर जरांगे पाटील समाधानी होतात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

दरम्यान, जरांगे यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नांदेड-नागपूर महामार्गावरील हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी महामार्ग रोखला. मागण्या मान्य करण्याची मागणी करत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला होता.

Iran Us Conflict : होर्मुझमध्ये संघर्षाची धग; इराणचा १० जहाजांवर हल्ल्याचा दावा

सोलापुरातही जरांगे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. सोलापूर विद्यापीठासमोरील पाण्याच्या टाकीवर काही युवक चढले. मागण्या मान्य होईपर्यंत खाली उतरणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. त्यामुळे संभाजीनगरातील आजच्या बैठकीतून सरकार कोणता निर्णय घेते आणि त्याचा जरांगे यांच्या उपोषणावर काय परिणाम होतो, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!