व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Manoj Jarange : मनोज जरांगेचा दावा ठरला फोल…त्यांचा बोलविता धनी कोण, राजकीय...

Manoj Jarange : मनोज जरांगेचा दावा ठरला फोल…त्यांचा बोलविता धनी कोण, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Manoj Jarange’s claim that Rekha Ambure’s caste certificate had been cancelled proves to be false : रेखा अंबुरे यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले नसल्याचे प्रशासनाने केले स्पष्ट

Nagpur महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून मराठा समाजाच्या उमेदवारांचे ओबीसी जात प्रमाणपत्र रद्द केले जात असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. पुराव्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले पत्रही त्यांनी दाखवले होते. मात्र, ज्या रेखा अंबुरे यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचे छातीठेकपणे सांगण्यात आले होते, त्यांचे प्रमाणपत्र रद्दच झाले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाकडे असा कोणताही अधिकृत आदेश किंवा नोंद उपलब्ध नसल्याने जरांगे-पाटील उघडे पडले असून, त्यांचे सर्व आरोप आणि दावे पूर्णपणे खोटे ठरले आहेत.

प्रशासनाच्या अधिकृत पत्रानुसार, २०२५ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रेखा अंबुरे यांची मागास प्रवर्ग-महिला प्रवर्गातून निवड झाल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या कुणबी जात नोंदीबाबत आक्षेप जरूर नोंदविण्यात आला होता, मात्र त्या आधारावर जात प्रमाणपत्र रद्द करण्याची कोणतीही अधिकृत कार्यवाही झालेली नाही. जरांगे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या दाव्यांचा प्रशासनाच्या पत्रात संदर्भ देण्यात आला आहे, परंतु त्यांच्या निवेदनातील माहिती आणि प्रशासनाकडे उपलब्ध असलेले अधिकृत अभिलेख यात तफावत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Rashtrasant Tukdoji Maharaj : सात गुरुदेवभक्त आमरण उपोषणावर, राष्ट्रसंतांना भारतरत्न देण्याची मागणी

त्यामुळे रेखा अंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याचा दावा अधिकृत नोंदींच्या आधारे सिद्ध होत नाही. प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत पुढील कोणतीही कार्यवाही सक्षम प्राधिकरणाच्या अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होईल, असे प्रशासनाचे म्हणणे असून आता यावर जरांगे काय उत्तर देतात, याकडे लक्ष लागले आहे.

याच मुद्द्यावरून जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मोठे आरोप केले होते. शिंदे सेनेचे आमदार व खासदार आमच्यामुळेच निवडून आले असल्याचा दावा करत, एकनाथ शिंदे यांनी या उपकाराची अशी परतफेड केल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला होता.

तसेच, शिंदे सेना व महायुतीच्या उमेदवारांना पाडण्याचे आवाहन समाजबांधवांना करत मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला होता, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता प्रशासनाच्या खुलाशामुळे हे आरोप कपोलकल्पित होते का, जरांगे यांनी नेमक्या कोणाच्या सांगण्यावर हे आरोप केले आणि त्यांचा ‘बोलविता धनी’ कोण, असे कळीचे प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.

error: Content is protected !!