Thackeray group accused of trying to create tension in communities : ठाकरे गटाचा समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
Mumbai: महाराष्ट्रात आज नवा आणि धोकादायक वाद उभा राहिला असून ‘मराठी विरुद्ध मारवाडी’ असा संघर्ष पेटल्याची चिन्हे दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका जैन मुनींच्या व्हिडिओत त्यांनी लालबाग परिसरात उद्धव ठाकरेंचा प्रभाव असल्याची टीका केली आणि शिवसेना ठाकरे गट तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर वक्तव्ये केली.
या व्हिडिओनंतर राजकारणात खळबळ उडाली असून ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी या मुनींच्या विधानांवर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. चित्रे यांनी भाजपावर मुंबईचे शांत वातावरण बिघडवण्याचा आणि समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. अखिल चित्रे यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर संबंधित व्हिडिओ पोस्ट करून मत नोंदवताना जैन मुनींची विधाने केवळ भडकवणारी आणि दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले.
त्यांनी शिवसेनेकडून जैन मतदारांना मारहाण केली जाते हा आरोप सरळसरळ खोटा असल्याचे सांगितले आणि आमचे खासदार, आमदार व नगरसेवक धर्म किंवा जात न पाहता सर्व मुंबईकरांची सेवा करतात असा दावा केला. “शिवसेनेने देरासरसमोर चिकन शिजवलं” या आरोपाचाही प्रतिवाद करत चित्रे म्हणाले की महाराष्ट्रात प्रत्येक नागरिकाला काय खायचे ते ठरवण्याचा अधिकार आहे आणि जाणीवपूर्वक खोटं बोलून धार्मिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Tapovan tree cutting : तपोवन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची मोठी हालचाल
तसेच विलेपार्ल्यामधील जैनालयाच्या रक्षणामागे कोणाचे प्रयत्न होते, आणि ते तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा सत्तेत कोण होते, हेही तपासण्याची गरज त्यांनी उपस्थित केली.
चित्रे यांनी पुढे म्हटले की मुंबई शांत, सुरक्षित आणि विकासाच्या दिशेने पुढे जावी, हेच आमचे स्वप्न आहे. परंतु भाजपाला ते नको असून मराठी विरुद्ध गुजराती, उत्तर भारतीय आणि हिंदीभाषिक असा संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न फसल्यावर आता मारवाडी विरुद्ध मराठी असा नवीन डाव रचला जात आहे.
Local Body Elections : ११ पालिकांच्या निकालावर ठरेल भविष्यातील राजकारण
एका तथाकथित जैन मुनीला पुढे करून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करण्याचा राजकीय प्रयत्न करण्यात येत असल्याचा त्यांचा आरोप आहे. जैन तत्त्वज्ञानात हिंसाचारास उत्तेजन देण्याला स्थानच नाही, मात्र या भाषणात हिंदू–मुस्लिम आणि ‘हिंदू–बांगलादेश’ असे विषय उकरून काढून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. जैन बांधवांनी शांतता राखावी आणि धर्माचा वापर राजकीय भडकावासाठी करणाऱ्यांपासून सावध राहावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
Local Body Elections : ‘क्रॉस वोटिंग’ची चलती! निकाल कोणाच्या पारड्यात?
या संपूर्ण प्रकरणाचा प्रभाव सरळ समाजांदरम्यानच्या नात्यावर पडण्याची शक्यता असून मराठी अस्मिता आणि अमराठी व्यापारी समाज यांच्यातील तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच महापालिका निवडणुका समीप असताना हा वाद राजकीय हेतूने आणखी पेटवला जाऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. मुंबईचे वातावरण संवेदनशील असताना एका व्हिडिओमुळे निर्माण झालेली चढाओढ कितीपर्यंत जाईल याबाबत राजकीय आणि सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त होत आहे.








