mpsc-exam-controversy-nagpur-students-protest : एमपीएससीच्या घोळाविरोधात मुख्यमंत्र्यांच्या शहरात विद्यार्थ्यांचा एल्गार !
Nagpur 8: नीट आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमध्ये सातत्याने होणाऱ्या घोळ आणि घोटाळ्यांमुळे संतप्त झालेले विद्यार्थी आता थेट रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील जंतर-मंतर आणि पुण्यातील मोठ्या आंदोलनानंतर आज मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. संविधान चौकात एकत्र आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी ‘लग्न ठरलं होतं, आयोगाने मोडलं!’ आणि ‘सरकार झामल-झामल करतंय’ अशा मजकुराचे अनोखे फलक झळकावत आयोगाविरोधात रोष व्यक्त केला.
विदर्भ स्पर्धा परीक्षा संघटनेच्या बॅनरखाली हे आंदोलन पार पडले. अलीकडेच एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याने ती परीक्षा रद्द करावी लागली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे उमेदीचे वर्ष वाया जात असून, वयोमर्यादा संपत चालल्याचा थेट आरोप विद्यार्थ्यांनी केला. एका परीक्षेतील घोटाळा उघड झाला असला, तरी यापूर्वीच्या अनेक परीक्षांमध्येही असा घोळ झाला असावा, असा संशय व्यक्त करत या सर्व प्रकाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे.
Nitin Gadkari : नियम तोडाल तर फक्त चालान नाही, थेट लायसन्स रद्द!
विशेष म्हणजे, पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार रोहित पवार हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. रोहित पवार स्वतः या आंदोलनात थेट सहभागी झाले नसले, तरी नागपूर आणि गोंदिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाची पडद्यामागून मजबूत बांधणी त्यांनीच केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Manoj jarange : मनोज जरांगेंच्या मागण्यांवर आज निर्णायक बैठक !
विरोधकांकडून एमपीएससीचे अध्यक्ष भीमणवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भीमणवार यांनी घोळ झाल्याचा आरोप असलेल्या परीक्षेची संपूर्ण तयारी आपण रुजू होण्यापूर्वीच झाली होती, असे सांगून या घोटाळ्याशी आपला काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, विरोधक भीमणवार यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यांच्या काळात घोटाळे झाले नसतील, तर कोणाच्या काळात झाले, याची नावे त्यांनी जाहीर करावीत, अशी मागणीही विरोधकांकडून केली जात आहे. भीमणवार यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे ते आणखीच अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.








