manoj kayande to apply baramati model for sindkhed raja development : बारामती मॉडेलची पाहणी; सिंदखेडराजात नवा प्रयोग करण्याची शक्यता
Buldhana बारामती दौऱ्यावर असलेले आमदार मनोज कायंदे सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. बहुराष्ट्रीय कंपनीतील कामगार आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली असली, तरी या दौऱ्यामागील खरा हेतू काय, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
राज्यात बारामती हे विकासाचे प्रभावी मॉडेल म्हणून ओळखले जाते. त्या पार्श्वभूमीवर कायंदे यांनी बारामतीची पाहणी केल्याने, आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने स्वतःची भूमिका अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः उद्योग व्यवस्थापन, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधांवरील चर्चांमधून त्यांनी ‘विकासाभिमुख’ प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे.
PM Awas Yojna : ९८ हजार घरकुले अपूर्ण; ‘घरकुल’ स्वप्न अजूनही अधांतरी
सिंदखेडराजा तालुक्यात बारामतीप्रमाणे विकासाचा पॅटर्न राबवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, हा ‘मॉडेल’ प्रत्यक्षात कितपत उतरवता येईल, याबाबत स्थानिक स्तरावर शंका व्यक्त होत आहेत. विकासाच्या नावाखाली राजकीय ताकद वाढवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
या दौऱ्यामुळे नागरिकांमध्येही मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जण विकासाच्या दृष्टीने हा सकारात्मक उपक्रम मानत असताना, काहींना यात राजकीय गणिते अधिक दिसत आहेत. त्यामुळे हा दौरा खऱ्या अर्थाने विकासासाठी ठरणार की आगामी राजकीय टायमिंग साधण्यासाठीचा भाग आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








