23-storey world-class hospital planned in Nagpur, featuring a helipad and air ambulance facilities for advanced healthcare coverage : ‘नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट’चे सरसंघचालकांच्या हस्ते लोकार्पण
Nagpur मध्य भारताची आरोग्य राजधानी असलेल्या नागपुरात आता जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांचे नवे दालन उघडले जाणार आहे. धरमपेठ येथील नॉर्थ अंबाझरी मार्गावर ‘डॉ. आबाजी थत्ते सेवा अनुसंधान संस्थे’च्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ‘नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट’ या भव्य २३ मजली मल्टी व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. ५ लाख चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले हे रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आपत्कालीन सुविधांनी सज्ज असणार आहे.
हे रुग्णालय मध्य भारतातील सर्वात उंच आणि सुसज्ज वैद्यकीय केंद्र ठरणार असून, इमारतीच्या गच्चीवर हेलिपॅडची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे अतिवृद्ध किंवा गंभीर रुग्णांसाठी ‘एअर ॲम्बुलन्स’ सेवा उपलब्ध होणार असून, तातडीच्या उपचारांसाठी लागणारा वेळ वाचवता येईल. सिंगापूरच्या ‘एस के’ या जागतिक दर्जाच्या वास्तू विशारद संस्थेने या प्रकल्पाचा आराखडा तयार केला असून, ४६१ बेडच्या या रुग्णालयात मेडिकल प्लॅनिंगला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
https://sattavedh.com/big-blow-to-arvind-kejriwal-seven-mps-left-aam-aadmi-party-likely-to-join-bj
या संस्थेमध्ये अवयव प्रत्यारोपण आणि बर्न वॉर्ड यांसारख्या गंभीर सुविधांवर विशेष भर दिला जाणार आहे. त्यासोबतच जेरियाट्रिक, रूमेट्रोलॉजी, हृदय व रक्तवाहिन्या, न्यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, युरोलॉजी आणि क्रीडा वैद्यकशास्त्रासह प्लास्टिक सर्जरी विभागही कार्यान्वित राहतील, अशी माहिती संस्थेचे सचिव शैलेश जोगळेकर यांनी दिली. केवळ उपचारच नव्हे, तर हे केंद्र एक शैक्षणिक केंद्र म्हणूनही ओळखले जाईल, जिथे पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांची सोय असेल.
Akola Municipal corporation : कुलूप तोडून कार्यालयात घुसखोरी; विरोधी पक्षनेत्यासह पाच जणांवर गुन्हा
या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती आणि कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सरसंघचालकांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण झाल्यानंतर प्रस्तावित इमारतीच्या प्रतिरूपाचे दर्शन घडवण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मेघा दीक्षित यांनी केले.








