व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र गडकरींचा ‘नो वेस्टेज’ जलमंत्र; प्रत्येक थेंब ठरणार शेतीचा तारणहार!

गडकरींचा ‘नो वेस्टेज’ जलमंत्र; प्रत्येक थेंब ठरणार शेतीचा तारणहार!

‘अॅग्रोव्हिजन २०२६’ व जलपरिषदेचे नागपुरात शानदार उद्घाटन

Nagpur : पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मोल ओळखून त्याचे योग्य नियोजन केले, तर दुष्काळावर मात करून शेतीला समृद्धीच्या दिशेने नेता येईल, असा महत्त्वपूर्ण संदेश केंद्रीय मंत्री आणि अॅग्रोव्हिजनचे प्रवर्तक नितीन गडकरी यांनी दिला. घरातील पाणी घरात, शेतातील पाणी शेतात आणि गावात पडणारा पाऊस त्याच गावात साठविण्याचे नियोजन झाले पाहिजे. पाण्याचा एकही थेंब वाया जाता कामा नये. प्रत्येक थेंबाला संघटित करून जलसाठा वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

पाणी व्यवस्थापन आणि पीक नियोजन’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘अॅग्रोव्हिजन २०२६’ आणि जलपरिषदेचे उद्घाटन शुक्रवारी नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात ते बोलत होते. जलपरिषदेचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

रोहित पवारांच्या वक्तव्यावरून दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने!

सिंचनाचा अभाव, कापसाचा वाढता उत्पादन खर्च आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने १७ वर्षांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती, असे सांगताना नितीन गडकरी यांनी शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता, इंधनदाता आणि हायड्रोजनदाता होण्याचे त्‍यावेळी पाहिलेले स्‍वप्‍न पूर्ण होताना पाहताना समाधान होत असल्‍याचे सांगितले.

शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. पुढील अॅग्रोव्हिजनपूर्वी किमान पाच हजार शेतकऱ्यांपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण, ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, हे अॅग्रोव्हिजनचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा आणि एकाही शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ येऊ नये, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.

विशेष सभा तहकूब केल्याने नेत्याचा संताप, पक्ष कार्यालयात घेतला नगरसेवकांचा ‘क्लास’!

नदीतील गाळ काढून तो रस्‍ते बांधकामासाठी विना रॉयल्‍टी वारण्‍यास परवानगी देणारा शासन निर्णय बिहार सरकारने काढला आहे. संजय राठोड यांनी आज केलेल्‍या मागणीनुसार महाराष्‍ट्र सरकार सोबतही असा करार करण्‍यात येईल, असे आश्‍वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.

error: Content is protected !!