व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Pravin pote patil : भाजपचे प्रवीण पोटे यांचा पहिल्याच फेरीत दणदणीत विजय;...

Pravin pote patil : भाजपचे प्रवीण पोटे यांचा पहिल्याच फेरीत दणदणीत विजय; काँग्रेसला शून्य मतांचा धक्का

BJP’s Pravin Pote Registers First-Round Victory; Congress Suffers a Blow with Zero Votes : काँग्रेस उमेदवार मॅनेज झाल्याचा आरोप निघाला खरा

Akola विधान परिषद अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी पहिल्याच फेरीत विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना मोठा धक्का दिला. पोटे यांनी तब्बल ३९० मते मिळवत एकतर्फी विजयाची नोंद केली. त्यांच्या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच प्रवीण पोटे यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. त्यांना एकूण ३९० मते मिळाल्याने विजयाचा मार्ग सुकर झाला. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना ३१ मते मिळाली. त्यांनी काही प्रमाणात मते मिळवली असली तरी भाजप उमेदवारांच्या प्रचंड आघाडीसमोर त्यांचे आव्हान टिकू शकले नाही.

Khamgao-Jalna railway : अधिसूचना आली, आता भूसंपादन आणि निधीसाठी खरी लढाई

मतमोजणीदरम्यान सहा मते अवैध ठरली. एकूण ४२१ वैध मतांची नोंद झाली. त्यापैकी ३९० मते मिळवत प्रवीण पोटे यांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या निकालामुळे स्थानिक राजकारणात भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवीण पोटे यांचे अभिनंदन करत हा विजय विकासकामांवरील जनतेच्या विश्वासाचा कौल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Vidarbha Farmers : खरीप हंगामात रोकडीचा तुटवडा; जिल्हाधिकाऱ्यांचे रिझर्व्ह बँकेला साकडे

काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे भाजपला मॅनेज झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांनी केला होता. त्यांचा हा आरोप खरा असल्याचे निवडणूक निकालानंतर सिद्ध झाले आहे. काँग्रेसने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला या निवडणुकीत मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारून ९१ नगरसेवकांनी मतदान केले होते.

error: Content is protected !!