rupali-chakankar-sit-inquiry-ashok-kharat-case-nashik : पुण्याहून नाशिकला जाताना गाडी बदलली, हालचालींवर वाढलं गूढ
Nashik : नाशिकमधील गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज विशेष तपास पथकासमोर हजर राहणार असल्याने राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्याहून सकाळी नाशिककडे रवाना होताना रुपाली चाकणकर यांनी वाटेत गाडी बदलल्याची तसेच प्रवासादरम्यान तीन ते चार वेळा वाहन थांबवल्याची माहिती समोर आल्याने या चौकशीभोवती अधिकच गूढ निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार आहे. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः त्यांची चौकशी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशीदरम्यान रुपाली चाकणकर यांच्यासोबत महिला वकीलही उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Nashik tcs case : निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप, घर आणि कार्यालयावर ‘बुलडोझर’ कारवाई?
अशोक खरात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक खुलासे समोर येत असून विविध स्तरांवरील अनेक व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे. आता या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्याबाबत एसआयटीकडून सविस्तर चौकशी केली जाणार आहे.
रुपाली चाकणकर या अशोक खरातने स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थेच्या विश्वस्त मंडळावर सलग दोन वेळा सदस्य राहिल्या होत्या. यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यातच अशोक खरातचे जाहीर व्यासपीठावर कौतुक करताना आणि त्याचे पाय धुतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
Supriya sule : मुंबई-पुणे महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता स्वतः रुपाली चाकणकर एसआयटीसमोर हजर राहत असल्याने या चौकशीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्या चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दुसरीकडे, अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. महिला अत्याचाराचे आठ आणि फसवणुकीचा एक अशा एकूण नऊ गुन्ह्यांमध्ये एसआयटी पुढील आठवड्यात दोषारोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत जमा करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील निष्कर्ष यांच्या आधारे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
https://sattavedh.com/sudhir-mungatiwar-mul-railway-goods-shed-project-finally-halted-powerful-follow-up-by-mla-sudhir-mungantiwar-achieves-major-succes
याचवेळी, फरार असलेल्या कल्पना खरातचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर शिर्डी पोलिसांनी जमीन खरेदी फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असला तरी कल्पना खरातबाबत त्याच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. पीसीएस प्रकरणातील निदा खानला महिनाभरात ताब्यात घेण्यात एसआयटीला यश आले असले तरी गेल्या चाळीस दिवसांपासून फरार असलेल्या कल्पना खरातचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.
__








