rupali-chakankar-reaction-ashok-kharat-case-pratibha-chakankar-inquiry-marathi-news : ‘बिनपुराव्यांचे आरोप, बदनामीचा कट’ असल्याचा थेट आरोप
Pune: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाची गती वाढत असताना संशयित खातेदार म्हणून नाव समोर आलेल्या प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल आठ तास चौकशी केली. या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपण कधीही समता पतसंस्थेत खाते उघडले नसल्याचे तसेच संबंधित पत्ता चुकीचा असल्याचे स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर तब्बल २८ दिवसांनंतर रुपाली चाकणकर यांनी सामाजिक माध्यमावर सविस्तर प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप होणे नवीन नाही, मात्र आपल्या आणि आपल्या कुटुंबाविरुद्ध होत असलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे, कपोलकल्पित आणि हेतूपुरस्सर बदनामी करण्यासाठी असल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत आहे. आरोप करणाऱ्यांनी अद्याप कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत, तसेच माध्यमांनीही त्याची शहानिशा केली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
Petrol diesel price : सरकारी कंपन्यांवर दररोज २४०० कोटींचा ताण, इंधनदर वाढीचा निर्णय लवकरच?
निनावी पत्राच्या मुद्द्यावर भाष्य करताना रुपाली चाकणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी विचारले की, हे पत्र आरोप करणाऱ्यांकडे कसे पोहोचले आणि त्यामागे कोणाचा हात आहे, हे समोर यायला हवे. कोणतीही पडताळणी न करता केवळ बदनामीचा उद्देश ठेवून पोलीस प्रशासनाकडे आलेले निनावी पत्र माध्यमांकडे देऊन चर्चेचा विषय बनवण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांची एका ताईवर टीका, दुसरीला शुभेच्छा!
रुपाली चाकणकर यांनी पुढे म्हटले आहे की, तर्कवितर्क, अफवा आणि अप्रमाणित माहितीच्या आधारे त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात आहे. सुरुवातीपासूनच आपण आपली भूमिका स्पष्टपणे मांडत आलो असून, अशोक खरात प्रकरणातील कोणत्याही आर्थिक किंवा जमीन व्यवहाराशी आपला थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तपास यंत्रणेला निष्पक्षपणे काम करता यावे, यासाठी आपण आतापर्यंत मौन बाळगले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तो १८ एप्रिलपर्यंत कोठडीत राहणार आहे. नाशिक सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले असताना सुनावणीदरम्यान त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तपास अधिकाऱ्यांनी केलेली पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने मान्य केल्यामुळे आता या प्रकरणातील तपास अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.
__








