व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Petrol diesel price : सरकारी कंपन्यांवर दररोज २४०० कोटींचा ताण, इंधनदर वाढीचा...

Petrol diesel price : सरकारी कंपन्यांवर दररोज २४०० कोटींचा ताण, इंधनदर वाढीचा निर्णय लवकरच?

petrol-diesel-price-hike-after-assembly-elections-india-fuel-rate-increase-marathi-news : विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीची तीव्र शक्यता

New Delhi : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या मोठ्या चढउतारांमुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची शक्यता अधिक गडद होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू असताना आता प्रत्यक्षात येत्या काही दिवसांत इंधनदर वाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

माहितीनुसार, देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निर्णय आतापर्यंत रोखून ठेवण्यात आला होता. मात्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारी तेल कंपन्या दरवाढीबाबत निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे निवडणुकांनंतर लगेचच इंधनदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांची एका ताईवर टीका, दुसरीला शुभेच्छा!

एप्रिल २०२२ पासून सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार झाले, कधी दर १२० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत गेले तर कधी ७० डॉलर्सपर्यंत खाली आले. तरीही देशांतर्गत दर स्थिर ठेवण्यात आले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या पेट्रोल विक्रीत प्रति लिटर सुमारे १८ रुपयांचा तर डिझेलमध्ये सुमारे ३५ रुपयांचा तोटा सरकारी कंपन्यांना सहन करावा लागत आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या प्रमुख कंपन्यांवर याचा मोठा आर्थिक परिणाम होत असून, काही काळापूर्वी या कंपन्यांना दिवसाला सुमारे २४०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता.

Mehkar municipal council : मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून मेहकर पालिकेत राजकीय वाद; विरोधकांचा सभेवर बहिष्कार

केंद्र सरकारने यापूर्वी उत्पादन शुल्कात कपात करून कंपन्यांचा काही प्रमाणात ताण कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत हा भार दीर्घकाळ पेलणे कंपन्यांसाठी कठीण होत चालले आहे. त्यामुळे इंधनदर वाढ अपरिहार्य असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

सध्या देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असले तरी ते उच्च पातळीवर आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ९४.७७ रुपये प्रति लिटर आहे, तर मुंबईत तो १०३.५० रुपये आहे. कोलकात्यात १०५.४१ रुपये, हैदराबादमध्ये १०७.४६ रुपये, बंगळुरूमध्ये १०२.९२ रुपये आणि चेन्नईत १०१.०६ रुपये प्रति लिटर दर आहे. डिझेलच्या बाबतीत दिल्लीमध्ये ८७.६७ रुपये, मुंबईत ९०.०३ रुपये, कोलकात्यात ९२.०२ रुपये, हैदराबादमध्ये ९५.७० रुपये, बंगळुरूमध्ये ९०.९९ रुपये आणि चेन्नईत ९२.६१ रुपये प्रति लिटर दर आहे.

Maharashtra RTO : रिक्षा परमिटची राज्यभर फेरतपासणी; मराठी न आल्यास परवाना रद्द!

इंधनदर वाढल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार असून, वाहतूक खर्च वाढल्यामुळे दैनंदिन वापरातील वस्तूंचे दरही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार आणि तेल कंपन्या काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

__

error: Content is protected !!