व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sharad Pawar : समाजात निर्माण झालेल्या दुहीचे पाप शरद पवारांचेच !

Sharad Pawar : समाजात निर्माण झालेल्या दुहीचे पाप शरद पवारांचेच !

Radhakrishna Vikhe Patil’s attack : राधाकृष्ण विखे पाटील यांचा घणाघात

Buldhana : समाजात आज निर्माण झालेली दुही, विसंवाद आणि संघर्ष यासाठी शरद पवार जबाबदार आहेत, असा थेट आरोप भाजप नेते व राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केला. ते बुलढाणा दौऱ्यावर असताना मराठा आणि ओबीसी आरक्षणावर भाष्य करत होते.

विखे पाटील म्हणाले, “सन 1994 मध्ये जर शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचा समावेश केला असता, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. समाज-समाजात जी दुही आणि वाद निर्माण झाला आहे, त्या पापाचे धनी पवार साहेबच आहेत.”

अलीकडेच सरकारच्या २ सप्टेंबरच्या जीआरवरून ओबीसी समाज आक्रमक झाला असून, उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने जीआरला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर ओबीसी नेत्यांनी सरकारविरुद्ध तीव्र भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांच्या सुरात सुर मिसळत पवारांवर निशाणा साधला.

Local body election : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर

हैदराबाद गॅझेटिअरनुसार ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम सुरू आहे. पण एक प्रश्न विचारू इच्छितो ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला होता का? नाही ना! मग आज या संघर्षाला कारणीभूत कोण? हे शरद पवार साहेबांनी 1994 मध्येच पेरलेलं बीज आहे, असं विखे पाटील म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या टीकेलाही विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. ते बांग देणाऱ्या कोंबड्यासारखे आहेत. त्यांचा पेपर फारसे लोक वाचत नाहीत, त्यामुळे ते काय म्हणतात याला काही महत्त्व नाही. सरकारने शेतकऱ्यांसाठी भरीव पॅकेज दिलं आहे.

Ministers raid : महसूलमंत्र्यांची धाड! कार्यालयात सापडले 5 हजार रुपये

तसेच सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावर बोलताना विखे पाटील म्हणाले, तो कोण आहे, हे अनेकांना माहित नाही. पोलिसांनी शिफारस केली असेल किंवा नसेल, या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी आधीच खुलासा केला आहे. विरोधकांचं काम एकच काही झालं की राजीनामा मागायचा, अशी टोलेबाजी त्यांनी केली.

________

error: Content is protected !!