व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या संघटन कौशल्याची छाप; ‘मन की बात’साठी बल्लारपूरचा शंभर...

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या संघटन कौशल्याची छाप; ‘मन की बात’साठी बल्लारपूरचा शंभर टक्के बूथ पॅटर्न

“Mungantiwar’s Organizational Strength Shines as Ballarpur Records 100% Booth Coverage for ‘Mann Ki Baat : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि संघटन कौशल्याची राज्यभरात चर्चा

Chandrapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बल्लारपूर मतदारसंघ ‘आदर्श’ ठरला आहे. मतदारसंघातील एकूण ३६६ पैकी ३६६ बूथवर शंभर टक्के आयोजन करत तब्बल ९,६७८ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या विक्रमी सहभागातून बल्लारपूरने भाजपच्या संघटनशक्तीचा नवा ठसा उमटविला आहे. या अभूतपूर्व यशामागे राज्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदारसंघातील सर्व ३६६ बूथवर नागरिक, महिला, युवा, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत ‘मन की बात’चे श्रवण केले. प्रत्येक बूथवर दिसून आलेला जनसहभाग आणि उत्साह हा केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता, समाजाशी असलेल्या सशक्त संवादाचा आणि आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या भक्कम संघटनशक्तीचाही प्रत्यय देणारा ठरला.

Sudhir mungantiwar: शेतकऱ्यांना न्याय, दुग्ध व्यवसायाला बळ आणि आरोग्य सुविधांचा विस्तार; मुनगंटीवारांनी त्रिसूत्रीच सांगितली

राजकीय वर्तुळात आणि निवडणूक रणनीतीत ‘बूथ जिंकला तर निवडणूक जिंकली’ हा मूळ मंत्र मानला जातो. बल्लारपूरमधील या उपक्रमाने भाजपचे बूथस्तरावरील संघटन किती अभेद्य आणि सक्रिय आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा दिली आहे. प्रत्येक बूथवरील सूक्ष्म नियोजन, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, वेळेचे काटेकोर व्यवस्थापन आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी यामुळे ‘मन की बात’ हा केवळ श्रवणाचा कार्यक्रम न राहता, बल्लारपूरातील भाजपच्या भक्कम संघटनशक्ती, कार्यकर्त्यांच्या एकजुटी आणि प्रभावी बूथ व्यवस्थापनाचे दमदार दर्शन घडविणारा उपक्रम ठरला.

राजकीय निरीक्षकांच्या मते, सर्वच्या सर्व ३६६ बूथवर एकाच वेळी कार्यक्रम आयोजित करणे आणि ९ हजारांपेक्षा अधिक लोकांना सक्रिय करणे ही साधी गोष्ट नाही. यामुळेच सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्व आणि संघटन कौशल्याचे कौतुक आता केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातील उर्वरित विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत कौतुकाने केले जात असून ‘बल्लारपूर पॅटर्न’ने संपूर्ण महाराष्ट्रासमोर भाजप संघटनाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.

error: Content is protected !!