Farmer couple commits suicide : भरोसा येथील घटना, एकाचवेळी घेतला गळफास
Chikhali : खामगाव तालुक्यातील भरोसा येथे कर्जबाजारीपणा, हुमणी अळीचा प्रादुर्भाव आणि शेतीतील अपयशामुळे शेतकरी स्व. गणेश श्रीराम थुट्टे (५५) आणि त्यांची पत्नी स्व. रंजना गणेश थुट्टे (५०) या दाम्पत्याने एकाचवेळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते रविकांत तुपकर यांनी थुट्टे कुटुंबीयांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट दिली.
Samruddhi Mahamarg : समृद्धीच्या अंडरपासमध्ये पावसाचे चिखल, शेतकऱ्यांना त्रास
शनिवारी अधिवेशनाच्या सुटीनंतर मेहकरमध्ये दाखल झाल्यानंतर प्रतापराव जाधव यांनी थेट भरोसा येथे जाऊन थुट्टे कुटुंबीयांची भेट घेतली. “निसर्गाच्या आपत्तीमुळे संकटं ओढवतात, पण शेतकरी बांधवांनी टोकाची भूमिका घेऊ नये. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले. प्रशासनाला तात्काळ आर्थिक मदतीचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव मोरे, तालुकाप्रमुख गजानन मोरे, संतोष भुतेकर, राजू पाटील, बाबुराव हाडे, पंजाबराव जावळे, अनमोल ढोरे, विष्णू घुबे, तसेच कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
Prataprao Jadhav : श्रावणात गोमुख धारेखाली भाविकांना हवी अंघोळीची परवानगी
या घटनेच्या दुसऱ्या दिवशी रविकांत तुपकर यांनीही थुट्टे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. यावेळी ते म्हणाले, “सरकारला आता तरी लाज वाटली पाहिजे. अजून किती बळी घेणार?” ही घटना केवळ एका कुटुंबाचं दु:ख नसून, हजारो शेतकऱ्यांच्या असुरक्षित भविष्यातील वेदना आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच, तातडीने कर्जमुक्ती, सोयाबीन व कापसाला हमीभाव वाढ यासंबंधी ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटनांनी पुन्हा एकदा शेतीमालाला स्थिर व हमीभाव देण्याच्या मागणीला धार मिळाली आहे.








