Protestors demand for the bridge : शेती पडीक, दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने संताप
Chikhali अंचरवाडी येथील शेतकऱ्यांचा संयम आता सुटला आहे. सावित्री नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात ७ ते ८ महिने जीव धोक्यात घालून शेती करावी लागते. गावजोड रस्त्यावर पूल नसल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती पडीक पडली असून, दुग्धव्यवसाय देखील उद्ध्वस्त झाला आहे. या गंभीर समस्येकडे वारंवार दुर्लक्ष झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
“१ सप्टेंबरपर्यंत पूलाबाबत निर्णय झाला नाही, तर २ सप्टेंबर रोजी सावित्री नदीत जलसमाधी आंदोलन करू,” असा इशारा शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
Zilla Parishad Elections : ओबीसींसाठी १६ तर खुल्या प्रवर्गासाठी २१ जागा राखीव?
या रस्त्यावरून जाणाऱ्या सावित्री नदीत पावसाळ्यात पाणी तुडुंब भरलेले असते. गुरांना चारा-पाणी पुरवणे अशक्य, दुधासाठी शेतात जाणे अशक्य – परिणामी दुग्धव्यवसायावर गदा. कपाशीचे प्लॉट असूनही रस्त्याअभावी पिकांची पाहणी करता येत नाही. “शेती आहे, पण उपयोग नाही, कारण तिकडे पोहोचताच येत नाही,” असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून, जलसमाधीचा इशारा देत त्यांनी प्रशासनाला २५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात निवेदन दिले.
Harshwardhan Sapkal : मराठा आरक्षणाची घोषणा करा; आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवा
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका प्रकल्पग्रस्ताने जलसमाधी घेतल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आता प्रशासन पूल मंजूर करते की शेतकऱ्यांना कठोर पाऊल उचलावे लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








